आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवरायांचे विचार अंगीकारत आज तरुणाई मिळवतेय देदीप्यमान यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 'छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सुराज्य हा उद्देश ठेवला होता. आपला माणूस आपल्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे, असे त्यांचे स्वप्न होते. शिवरायांचे विचार अंगीकारत आजचा तरुण प्रत्येक क्षेत्रात देदीप्यमान यश संपादन करत आहे', असे प्रतिपादन गड संवर्धन समितीचे ब्रँड अॅम्बेसेडर खासदार संभाजीराजे भोसले यांनी सोमवारी येथे केले. 


'दिव्य मराठी'तर्फे विविध क्षेत्रातील यशकर्त्यांना 'यशाचे शिलेदार' म्हणून खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम शुभम लॉन्स येथे मोठ्या थाटात झाला. 


खासदार संभाजीराजे म्हणाले, यशाच्या पायरीवर पोहोचणे सोपे नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व बहुजनांना एकत्र केले. त्यांचा विकास केला. स्वत:पेक्षा रयतेची उन्नती करणे, हा उद्देश त्यांनी ठेवला. लोकांच्या यशामध्ये आपले यश मानले. 'दिव्य मराठी'ने अशा यशाच्या शिल्पकारांना एकत्र आणून त्यांचा गौरव केला, तो स्तुत्य आहे. हे यशाचे शिल्पकार सामाजिक क्षेत्रात खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. हा उपक्रम आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा राबवू. 


मंचावर 'दिव्य मराठी'चे निवासी संपादक संजीव पिंपरकर, युनिट हेड नौशाद शेख, कॉँग्रेसच्या नेत्या इंदुमती अलगोंड उपस्थित होत्या. प्रास्ताविक करताना श्री. पिंपरकर यांनी 'दिव्य मराठी'च्या उपक्रमांची माहिती दिली. श्री. शेख यांनी आभार मानले. अनिस सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. 


यांचा झाला गौरव 
पगडी व प्रमाणपत्र देऊन मोठ्या थाटात सवाद्य गौरव करण्यात आला. शिलेदारांनी आपल्या कुटुंबीयांसह सत्कार स्वीकारला. त्यात राहुल अलगोंड, फारुख काझी, हाजी नसीर खलिफा, अतुल लोंढे पाटील, परेश खंडागळे, त्र्यंबक ढेंगळे-पाटील, अमोल केकडे, समीर शिंदे, जन्मेजयराजे भोसले, गणेश करे-पाटील, जयंत होले-पाटील, राजेश डोंगरे, नितीन कुदळे, इलियास शेख, नवनाथ कसपटे, रतनलाल अगरवाल, अविनाश बाबर, राजेंद्र हजारे यांचा समावेश होता. 

बातम्या आणखी आहेत...