आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूरच्या तरुणाचा ऑस्ट्रेलियामध्ये मृत्यू; मेलबर्नमध्ये घेत होता अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- येथील ओमप्रकाश महादेव ठाकरे (वय २५) या तरुणाचा आॅस्ट्रेलियातील मेलबर्न येथे आकस्मिक मृत्यू झाला. शिवपार्वतीनगरात वास्तव्यास असणारे त्याचे वडील महादेव संदीपान ठाकरे यांनी ही माहिती दिली. ओमप्रकाश अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण आठ ते नऊ महिन्यांपासून मेलबर्न येथे घेत होता. 


तो स्विनबर्न युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नोलॉजी हॉवर्थन येथे शिकत होता. त्याच्या कुटुंबीयांना ओमप्रकाश याचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी पहाटे मिळाली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ओमप्रकाश हा अतिशय हुशार, अभ्यासू आणि हरहुन्नरी होता. पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना पंढरपूरला सुटीला आल्यावर येथील विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन करीत असे. दीड ते दोन महिन्यापूर्वीच आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आॅस्ट्रेलियातून तो पंढरपूरला एका महिन्यासाठी आला होता. 


शोकाकुल नातेवाइकांना पार्थिव देहाची प्रतिक्षा 
ओमप्रकाशची आई शिक्षिका, वडील एलआयसीमध्ये विकास अधिकारी आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. शनिवार, रविवार असे सलग दोन दिवस सुटी असल्याने आॅस्ट्रेलियातून त्याचे पार्थिव भारतात केव्हा आणण्यात येणार याबद्दल त्याचे नातेवाईक चिंता करीत आहेत. मुंबई येथील ओमप्रकाशची बहीण व तिचे पती परराष्ट्र मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...