आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप मानेंसह १३ माजी संचालकांना १७ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी माजी आमदार दिलीप माने यांच्यासह १३ माजी संचालकांना मुंबई उच्च न्यायालयाने १७ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 


दिलीप माने, इंदूमती अलगोंडा, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, उर्मिला शिंदे, सोजर पाटील, उत्तरेश्वर गुठ्ठे, राजशेखर शिवदारे, बसवराज दुलंगे, सिद्धाराम चाकोते, प्रभाकर विभूते, अप्पाराव उंबरजे, सिध्दाराम यारगळ या तेरा संचालकांना २२ जून रोजी सोलापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. या निर्णयाच्या विरोधात या तेरा जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...