आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! सर्व सशुल्क सेवांवर बँक घेतेय 18% जीएसटी; चेकबुक, पासबुकनोंदणी आदी शुल्कांवर आकारणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीयकृत बँकांकडून पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांवर शुल्क आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारणी खातेदारांवर केली जात आहे. वर्षातील पहिल्यांदा मोफत लाभ घेता येऊ शकेल. दुसऱ्या वेळी लाभ घ्यायचा असल्यास मात्र शुल्क व त्यावर १८ टक्के कर आकारणी केली जात आहे.

 

१ जुलैपासून जीएसटी आकारणीची अंमलबजावणी सुरू आहे. यास बँक ऑफ इंडियाचे प्रशांत निशाणदार यांनी दुजोरा देत प्रत्येक बँकेचे सेवा शुल्क वेगवेगळे असले तरी त्यावर जीएसटी मात्र १८ टक्के अाकारणी करीत आहेत. यापूर्वी १५ टक्के सेवाकराची आकारणी केली जात होती. आता त्यामध्ये ३ टक्के वाढ होऊन एकूण १८ टक्के जीएसटी आकारणी केली जात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, शुल्क आकारणी नसलेल्या सेवांवर कोणताही कर आकारला जात नाही. केवळ सशुल्क सेवांवर शुल्काच्या प्रमाणात कर वसूल केला जात आहे.


सेवेनुसार शुल्क व जीएसटी
चेकबुक : बचत खातेधारकास वर्षातून एकदाच २० पानांचे चेकबुक कोणतेही शुल्क न आकारता दिले जात आहे. त्यानंतर पुढील एका चेकसाठी ३ रुपये व त्यावर १८ टक्के जीएसटी अाकारणी केली जात आहे. चालू खाते, सीसी व ओडी खातेधारकासही पहिल्या २० पानांचे चेकबुक विनाशुल्क आहे. मात्र त्यानंतर पुढील एका चेकसाठी चार रुपये व त्यावर १८ टक्के जीएसटी आकारणी केली जात आहे.

 

पासबुक, शिल्लक प्रमाणपत्र : पहिले पासबुक विनाशुल्क दिले जात आहे. दुबार पासबुकसाठी १०० रुपये शुल्क व जीएसटी. बँक स्टेटमेंटसाठी ४० एन्ट्री १५० रुपये व त्यावर जीएसटी वसूल केला जात आहे.

 

स्टॉप पेमेंट : स्टॉप पेमेंटसाठी बचत खातेदारांना एका चेकसाठी १०० रुपये आणि जीएसटी. चालू खाते, सीसी व ओडी खातेधारकांना प्रती चेक २०० रुपये व जीएसटी.


खाते बंद करणे : खाते उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत बचत खाते बंद केल्यास २०० रुपये तर चालू खातेधारकास ५०० रुपये शुल्क व त्यावर १८ टक्के जीएसटी लागू आहे.


चेक परत येणे : एक लाखापर्यंत २५० रुपये आणि जीएसटी, १ लाख ते १ कोटीपर्यंत ५०० रुपये व जीएसटी, १ कोटीपेक्षा अधिक ७५० आणि जीएसटी.

 

सही पडताळणी व बेबाकी दाखला : १५० सेवा शुल्क व १८ टक्के

 

कॅश हॅन्डलिंग : बचत खात्यासाठी कोणतेही शुल्क आकारणी नाही, चालू खातेदारांना १ लाखापेक्षा अधिक रक्कम भरल्यास एका हजार रुपयास १ रुपये आणि अधिकाधिक ५ हजार रुपये व जीएसटी.

 

व्याजदर प्रमाणपत्र : वर्षातून पहिले प्रमाणपत्र मोफत मिळेल, एकापेक्षा अधिकसाठी १०० रुपये सेवा शुल्क व जीएसटी.

 

एसएमएस सेवा : बँक खात्यावरील व्यवहारांच्या एसएमएस सेवेसाठी दर तीन महिन्याला १५ रुपये शुल्क व जीएसटी.

 

किमान शिल्लक : चेकबुक असलेल्या बचत खातेदाराच्या बँक खात्यावर तीन महिन्यात सरासरी ५०० रुपयांपेक्षा कमी असल्यास ५४ रुपये शुल्क व जीएसटी तर चेकबुक नसलेल्या खातेदारांना ४० रुपये व जीएसटी.

 

बातम्या आणखी आहेत...