आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहाव्याचा विधीवरुन परतणारा टेम्पो टायर फुटल्याने उलटला, 21 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा (सोलापूर) - पंढरपूरवरुन दहाव्याचा विधी उरकून बार्शीकडे जात असेलेला टेम्पो टायर फुटल्याने माढ्याजवळ उलटला. या अपघातात टेम्पोत असलेले 21 लोक जखमी झाले असून यात 12 पुरुष व  9 महिलांचा समावेश आहे.  यातील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना माढा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले आहे. हा अपघात वडाचीवाडी येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. 


मिळालेल्या माहितीनुसार उक्क्कडगाव ता.बार्शी येथिल द्रोपदी इंदुरराव पाटील याचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या दहाव्याचा विधी करण्यासाठी उकक्डगाव व कंळबवाडी येथील पाहूणे मंडळी पंढरपूरला सकाळी गेले होते. हा विधी उरकुन शेटफळ मधुन माढा मार्गे बार्शीकडे जात असताना वडाचीवाडी गावानजीक 407 टाटा कंपनीचा टेम्पो टायर फुटल्याने पलटी झाला. टेम्पोत एकुण 35 जण होते. 35 पैकी 21 जण जखमी झाले आहेत.

 

या अपघाताची माहिती मिळताच माढा व शेटफळ  ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. या दोन रुग्णवाहिकेतुन 21 रुग्णांना माढा रुग्णालयात आणले असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डाॅ.प्रिती भंडारी या उपचार करीत आहेत. चार जणांची  डोकी फुटले आहेत.  दोघांचे पाय दोघांचे हात  फॅक्चर झाले आहेत. इतर रुग्णांना ही गंभीर दुखापत झाली आहे.या अपघातात बाबासाहेब त्र्यिबंक मुंडे,आण्णासाहेब इंदरराव पाटील,उशा अरुण पाटील,आशाबाई डोळे,सुशीला सुदरा पाटील,व्यकटी नानाभाऊ घुगे, कोंडाबाई उध्दव मुंडे,उध्धव दशरथ मुंडे, भागवंत काशिनाथ मुंडे याचेसह अन्या ही लोक जखमी झाले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...