आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्याकडून 4 विद्यार्थ्यांना काठीने मारहाण, पंढरपुरातील अरिहंत पब्लिक स्कूलमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - पंढरपुरातील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये प्राचार्याने ४ विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. आशिषकुमार घोष असे प्राचार्याचे नाव आहे. काठीने मारहाण केल्याचे घोष याने कबुल केले.   


याबाबत मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी जयंत तनपुरे या विद्यार्थ्याने घडल्या प्रकाराची माहिती देताना सांगितले, मंगळवारी सकाळी विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने सर्व मुले शाळेत लवकर आली होती. त्यानंतर शाळेचे प्राचार्य आशिषकुमार घोष यांनी विद्यार्थ्यांना बोलवले. मात्र, विद्यार्थी आले नसल्याचा राग मनात धरून घोष याने विद्यार्थ्यांना सीसीटिव्ही कॅमेरा नसलेल्या वर्गात नेऊन शिक्षा करण्याच्या नावाखाली काठीने बेदम झोडपून काढले. यात जयंत तनपुरे या विद्यार्थ्याच्या हाताला जखम झाली. त्याच्या बरोबरच निखिल निंबाळकर, कैफ तांबोळी, आदर्श सावंत, सम्यक फडे आदी विद्यार्थ्यांना देखील हातावर, नडगीवर, पाठीवर चोप दिला. वर्गातील विद्यार्थिनींनी गोंधळ घातल्यावर ही बाब लक्षात आली. शाळेतील इतर शिक्षकांनी घोष यांना थांबविले.  


ही बाब मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना समजल्यावर अनेक पालक शाळेत जमा झाले. त्यांनी घोष यांना चांगलेच धारेवर धरले. त्या वेळी घोष यांनी पालकांना उध्दट उत्तरे दिली.

बातम्या आणखी आहेत...