आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या कारखान्यात दरवर्षी 400 रेल्वे डब्यांची निर्मिती, 31 मार्चला भूमिपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लातूरला रेल्वे डबा निर्मिती कारखाना उभा करण्याचे काम सिकंदराबाद येथील आरव्हीएनएल कंपनीला देण्यात अाले अाहे. आता रेल्वे प्रशासनाने या कारखान्यामधून दरवर्षी सुमारे ४०० डब्यांची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

 

खुद्द  रेल्वेमंत्री पीयूष गोयल या कामासाठी अाग्रही असल्याने हे काम फास्ट ट्रॅकवर केले जाणार आहे. येत्या ३१ मार्च रोजी लातुरमध्ये या कारखान्याचे भूमिपूजन होणार अाहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती असेल.  


महाराष्ट्रातील पहिला रेल्वे डबा निर्मितीचा कारखाना लातूरला उभारला जात अाहे. या कारखान्यासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कारखान्याचे काम एकूण तीन टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. पहिल्या टप्यात ‘मेमु’चे (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) काम चालणार आहे. यात दरवर्षी सुमारे २५० मेमु कोचेस तयार करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात ईएमयूचे  (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) कोचेस तयार करण्यात येतील.  त्यानुसार, वर्षभराच्या कालावधीत सुमारे १२५ ईएमयू कोचेस तयार करण्यात येतील. तर तिसऱ्या टप्प्यात  (मेट्रो) कोचेस तयार केले जातील. वर्षभरात ७५ कोचेस तयार करण्याचे नियोजन आहे.