आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी तलाव सुशोभीकरणाला पर्यटन खात्याकडून 5 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सिद्धेश्वर व कंबर तलाव शहराची फुफ्फुसे समजली जातात. परंतु सध्या या दाेन्ही तलावांची मोठी दुर्दशा झाली. पैकी कंबर तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्याच्या पर्यटन विकास खात्याने ४ कोटी ९३ लाख ८२ हजार रुपये मंजूर केले. त्यातून या तलावाचे सुशोभीकरण होईल. शिवाय जलपर्णींचे समूळ उच्चाटन करण्याचे उपाय योजले जातील. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० लाख रुपये जमाही झाल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

 

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे श्री. देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे हा निधी मंजूर झाला. जवळपास ५ काेटींच्या रकमेतून राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसरातील बागही नव्याने विकसित करण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत विकासाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. ५ कोटींंचा हा मूळ आराखडा आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे मिळतील, असे देशमुख म्हणाले.

 

असे आहे तलाव
पूर्वेकडे स्मृतिवन, पश्चिमेकडे पदपाथ, उत्तरेकडे लोहमार्ग आणि दक्षिणेकडे बाग अशी तलावाची रचना आहे. ५० एकरांवर विस्तीर्ण पसरलेल्या या तलावाची खोली साडेतीन मीटर आहे. नैसर्गिक झरे आणि पावसाच्या पाण्याने तलावातील पाणी टिकून राहते. परंतु परिसरातील साेसायट्यांचे सांडपाणी त्यात सोडल्याने प्रचंड जलप्रदूषण झाले. परिणामी संपूर्ण तलावाचा ताबा जलपर्णीने घेतला. अशा स्थितीत त्याच्या सुशोभीकरणाचा विषय पुढे आला अाहे.

बातम्या आणखी आहेत...