आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या जन्मलेल्या लेकींच्या नावे आता पाच हजार, विशेष पोलिस महानिरीक्षकांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिसाची पत्नी अथवा महिला पोलिसाला बाळंतपणात पाच हजारांची तर मुलगी झाल्यास वेगळे पाच हजार रुपये तसेच मुलींसाठी शैक्षणिक खर्च म्हणून दरवर्षी जुलै महिन्यात ५०० रुपयांची शासनाकडून मदत मिळणार अाहे. ही योजना सुरू झाली असून, पोलिस वेल्फेअर विभागात अर्ज करून याचा लाभ घेऊ शकता, अशी माहिती राज्याचे प्रशासन विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह यांनी येथे बोलताना दिली.

 

ग्रामीण पोलिस मुख्यालय मैदानावर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मदतीने स्पिरिच्युअल बाग तयार करण्यात अाली अाहे. त्याचा शुभारंभ श्री. सिंह यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. हिंदुस्थान पेट्रोलियमचे मुख्य महाप्रबंधक कानरू श्रीनिवास, उपमहाप्रबंधक पी. सुंदरबाबू, मुख्य क्षेत्रीय प्रबंधक पी. रवींदर, पोलिस अायुक्त महादेव तांबडे, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक एच. एम. अत्तार व्यासपीठावर होते.

 

हिदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मदतीने ही सुंदर बाग तयार झाली अाहे. पोलिस व त्यांच्या परिवाराने याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करावा. मुलांसाठी मैदानी खेळाची अावड निर्माण करा. पोलिसांनो तणावरहित जीवन जगाव. मेडिटेशन करा. तंबाखू सेवन, मद्य प्राशन करू नका. घरातीलच जेवण घ्या. सोबत कधीही घरातून अाणलेली पोळी- भाजी ठेवा. सकारात्मक विचार करा यामुळे अापले अायुष्यमान उंचावेल, अारोग्य चांगले राहील.

 

पोलिसांच्या कुठल्याही योजनेला अामची मदत राहील. बीड पोलिसांसाठीही बाग तयार केली अाहे. सोलापुरात पोलिस मुख्यालयात अारअो पाण्याची सोय केल्याची माहिती श्री. श्रीनिवास यांनी दिली. पोलिस अधीक्षक प्रभू यांनी विविध योजनांची माहिती दिली. जीम व मोटारवाहन विभागाच्या नूतनीकरणाची श्री. सिंह यांनी पाहणी केली. शहर पोलिस मुख्यालय मैदानावर पोलिस पब्लिक स्कूल अाहे. सध्या अाठवीपर्यंत वर्ग अाहेत. त्यांची स्ट्रेंथ वाढवून बारावीपर्यंत वर्ग करण्यासाठी इमारत बांधकामासाठी निधी मिळावा, अशी मागणी आयुक्त तांबडे यांनी केली. पोलिस निरीक्षक नाना कदम यांचा श्री. सिंह यांच्या हस्ते पेट्रोलपंप, बाग या कामात योगदान दिल्याबद्दल सत्कार झाला.

बातम्या आणखी आहेत...