आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्वात माेठे धरण काेयनेत ६४ टीएमसी जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत २४ टीएमसी जास्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराड- राज्यातील सर्वात माेठे धरण असलेल्या काेयना (जि.सातारा) येथील पाणलाेट क्षेत्रात गेल्या अाठवडाभरापासून पावसाचा जाेर कायम अाहे, त्यामुळे या धरणाचा जलसाठा रविवारी ६४.९१ टीएमसीपर्यंत गेला हाेता. 


शनिवारी सायंकाळी पाच ते रविवारी सकाळी अाठ या १५ तासांमध्ये कोयना धरणातील जलसाठा सुमारे २ टीएमसीने वाढला. सध्या काेयनेत उपयुक्त जलसाठा ५९.९१ टीएमसी असून संपूर्ण क्षमतेने धरण भरण्यासाठी अजून ४० टीएमसी पाण्याची अावश्यकता अाहे. 


कोयना धरण पाणलोट क्षेत्र असलेल्या कोयनेसह नवजा, महाबळेश्वर येथे आठवडाभरापासून मुसळधार सुरू आहे. त्यामुळे धरणात शनिवारी सायंकाळी प्रतिसेकंद ५३ हजार २०९ क्युसेक आवक सुरू होत होती. शनिवारी सायंकाळनंतर रविवार सकाळपर्यंत कोयना येथे ७७ मि. मी. पावसाची नोंद झाली. नवजा येथे ८० आणि महाबळेश्वर येथे ९३ मि. मी. नोंद झाली. त्यामुळेच शनिवारी सायंकाळी काेयनेत असलेला ६३.७ टीएमसी साठा रविवारी सकाळपर्यंत ६४.९१ टीएमसीपर्यंत पाेहाेचला. रविवारी सकाळी धरणाची पाणी उंची २ हजार १२४ फूट इतकी तर जल पातळी ६४७.४४६ मीटर इतकी होती. गेल्यावर्षी १५ जुलैला धरणातील पाणीसाठा ४१.४० टीएमसी इतका होता. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २४ टीएमसी जास्त पाणीसाठा अाहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता १०५ टीएमसी अाहे. 

बातम्या आणखी आहेत...