आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: वस्ती नसतानाही मंजूर केलेले 9 कोटींचे रस्ते आयुक्तांकडून रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नागरी वसाहत नाही अशा भागात तूर्तास रस्ते न करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी घेतला आहे. नागरी वसाहत नसलेल्या भागातील ले आऊटला मंजुरी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. प्रताप नगर, ५४ मीटर रस्ता, शेळगी आदी भागातील सुमारे ८ कोटी ६७ लाख रुपयांचे ६.२८ किलोमीटर लांबीचे ५ रस्ते रद्द केले आहेत. नव्याने काढण्यात येणाऱ्या निविदेत या रस्त्यांचा समावेश असणार नाही.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) याेजनेअंतर्गत २५२ कोटींचे रस्ते करण्यात येत आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेने शासनाकडे अनुदान मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात ६ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याने ते रस्ते महापालिकेने ताब्यात घेतले. नव्याने काही रस्त्यांसाठी महापालिका निविदा काढणार आहे.
आवश्यकता आहे तेथे रस्ते करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. रद्द केलेल्या रस्त्यांमध्ये प्रताप नगर, डोणगाव रोड, राजस्व नगर, ५४ मीटर अंतर्गत रस्ते, शेळगी मित्रनगर परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे.

 

आयुक्तांनी रद्द केलेले रस्ते
१) सेंट थाॅमस ते प्रतापनगर स्मशानभूमी ३७० मीटर (१.२३ कोटी)
२) सुभद्रा मंगल कार्यालय ते सेंट थाॅमस ते राजस्व नगर १.५९ किमी (४.६१ कोटी)
३) सेंट थाॅमस ते डोणगाव रोड १.०२ किमी (१.३१ कोटी)
४) राजस्व नगर ते एसआरपी कॅम्प पर्यंत ५४ मीटर २.५ किमी (रक्कम निश्चित नाही)
५) शेळगी मित्रनगर ते तिरंगा चौक ८०० मीटर (१.५२ कोटी)

 

निविदा काढणार नाही
ज्या भागात नागरी वसाहत नाही त्या भागातील मंजूर रस्ते रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या निविदा काढण्यात येणार नाही. महापालिका आयुक्तांसमोर आढावा घेताना यावर चर्चा झाली.
- संदीप कारंजे, प्र. मनपा नगर अभियंता

 

रस्ते रद्द करण्याची कारणे
डोणगाव रोडसह अन्य रस्त्याच्या ठिकाणी नागरी वसाहत नाही. प्रतापनगर रोडवरील काही जागा मनपाच्या ताब्यात नाहीत. ५४ मीटर रस्त्यावर वन विभागाची जागा आहे. भूसंपादनाचा प्रश्न आहे. शेळगी मित्रनगर ते तिरंगा चौक पर्यंत रस्ता ५.५ मीटर असून, तो चांगल्या स्थितीत आहे.

 

हे रस्ते कोणी सुचवले?
नागरी वसाहत नसताना सन २००९-१० मध्ये रस्ते सुचवून मंजूर करण्यात आले. ८ वर्ष झाले तरी त्या परिसरात नागरी वसाहत झाली नाही. पुढील ४ वर्षात वसाहत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे रस्ते कोणी सुचवले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या परिसरात पुढाऱ्यांच्या जमिनी आहेत काय? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...