आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई -गदग एक्सप्रेसच्या शेजारील डब्याला आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी)च्या वॉशिग सायडिंग वर उभे असलेल्या रिकाम्या जनरल डब्याला मंगळवारी दुपारी २ वाजुन ५० मिनीटांनी अचानक आग लागली. या डब्याच्या शेजारी मुंबई -सोलापूर -गदग एक्सप्रेसचा रेक उभा होता. आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ रेल्वे प्रशासनाने हा रेक बाजुला नेला.

 

अग्नीशामक दलाचे तिन बंबानी आग नियंत्रणात आणली. कचऱ्यामुळे रिकाम्या डब्याला आग लागल्याची शक्यता वर्तविण्यता येत आहे. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डि के शर्मा यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, ही आग कुठल्या कारणाने लागली याचा शोध घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी या वेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...