आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेडफोनवर गाणी ऐकत रुळ ओलांडणाऱ्या तरुणाचा रेल्वे इंजिनाच्या धडकेत मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- मोबाइल हेडफोन कानाला लावून रुळ ओलांडणाऱ्या तरुणाचा रेल्वे इंजिनाच्या धडकेत मृत्यू झाला. उमेश प्रभाकर खिलारे (१८, सुलेमान चाळ, पंढरपूर) असे त्याचे नाव आहे. पंढरपूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. 


उमेश हेडफोनवर गाणे ऐकत स्टेशनच्या फलाट एकवरून रुळ ओलांडत दोन क्रमांकाच्या फलाटाकडे निघाला होता. याच दरम्यान कुर्डुवाडीवरून मिरजकडे रेल्वे इंजिन निघाले. पंढरपूर स्थानकाच्या जवळ येताच इंजिनाने मोठ्याने हॉर्न वाजविला. परंतु कानात हेडफोन असल्यामुळे उमेशला तो ऐकू आला नाही. इंजिनची जोराची धडक बसल्यामुळे तो बाजूला फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो जागीच गतप्राण झाला. घटनेनंतर उमेशच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 


दुसरी दुर्घटना 
दीड वर्षापूर्वी बार्शी येथे हेडफोन कानाला लावून रुळ ओलांडणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला होता. ९ डिसेंबर २०१६ रोजी २७ वर्षीय क्षितिज सुलाखे हा सकाळी फिरायला गेला असता रेल्वेच्या धडकेने तो मृत्युमुखी पडला होता. 

बातम्या आणखी आहेत...