आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात तयार होणार 'आधारवड' चित्रपट, नगरसेवक राजकुमार हंचाटे यांची निर्मिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांची निर्मिती असलेला आधारवड हा मराठी चित्रपट तयार करण्यात येत आहे. आजच्या कुटुंब पद्धतीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात स्थानिक कलावंतांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवाय मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, जयराज नायर, मानसी नाईक, अमीर तळवळकर यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. सध्याच्या कुटुंब पद्धतीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. येत्या काही दिवसांत सोलापूर व सोलापूर परिसरात चित्रीकरण सुरू होणार आहे.  

 

वेगळा विचार रुजवायचा आहे
नगरसेवक हंचाटे यांच्या हिंगलाज माता फेम प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटात रोहित हंचाटे व समृद्धी शिमगे ही तरुण जोडी मुख्य भूमिका असून दिग्दर्शन पवन बनसोडे यांचे आहे. आदर्श शिंदे, रेश्मा सोनावणे व स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात गाणी असतील.

 

आज स्थानिक कलावंतांची निवड
शनिवारी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी स्थानिक कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. सिनेकलावंत शैलेश पितांबरे, जयराज नायर हे याची ऑडिशन घेणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...