आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापुरात गुन्हा दाखल करण्यास विलंब; गर्भपात करणाऱ्या डॉक्टर दांपत्याने केले पलायन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळापूर- वेळापूर (ता. माळशिरस) येथील आनंद मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम, दोशी अल्ट्रासाउंड क्लिनिकची जिल्हा अारोग्य विभागाच्या पथकाने साेमवारी (दि. ११) दुपारी तपासणी केली. यात गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डॉ. आनंद दोशी, डॉ. जयश्री दोशी या दांपत्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याने डॉक्टर दांपत्याने पलायन केले. गर्भपात केंद्राची मान्यता नसतानाही दोशी दांपत्य गर्भपात करत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमीत अणदूरकर यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद जामदार, जिल्हा विधी समुपदेशक ॲड. रामेश्वरी माने यांच्या पथकाने दुपारी तीन वाजता छापा टाकून तपासणी सुरू केली. या रुग्णालयामध्ये २०१३ पासून आठ ते नऊ गर्भपात केल्याचे आढळून आले. तपासणी पथकाने ऑपरेशन थिएटर, प्रसूतीगृह, गर्भपाताची सामग्री, गर्भपातासाठीचा चार बॉक्स मुदतबाह्य औषधसाठा सील केला. 


तपासणीनंतर पथकाने संशयित दोशी दांपत्यांना ताब्यात घेण्याची येथील पोलिस अधिकारी जगताप यांना विनंती केली. त्यांनी आधी पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल करा, त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे पथक गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात होते. दरम्यान, दोशी दांपत्याने पलायन केले. 


यामुळे फुटले बिंग 
पुणे जिल्ह्यातील एका तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेचा डाॅ. दोशी दांपत्याने गर्भपात केला. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. ती अधिकच गंभीर झाल्याने तिला एका मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर या गर्भपाताचे बिंग फुटले. त्यानंतर दुुपारी तीन वाजता अारोग्य खात्याच्या पथकाने आनंद मॅटर्निटी होमवर छापा टाकला. रात्री आठपर्यंत तपासणी सुरू होती. 

बातम्या आणखी आहेत...