आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरकुतलेल्या हातांना गोधडी रूपाने मिळतोय आर्थिक सबलतेचा धागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वयाच्या साठ वर्षांनंतर महिलांचे घरातील महत्त्व कमी होत जाते. तसेच आर्थिक कणाही कमकुवत झालेला असतो. अशा सुरकुतलेल्या हातांना काम देण्याबरोबरच गोधडी शिवण्याची जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न येथील युवा डिझायनर विनय नारकर करत आहेत. 


हातमाग साडी उद्योग या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नाव म्हणजे विनय नारकर. या आपल्या अनुभवाचा ग्रामीण भागातील वस्त्र कलेत पारंगत असणाऱ्या महिलांना उपयोग व्हावा व त्यांच्या थकलेल्या हातांना उद्योग मिळावा, आर्थिक मदत व्हावी म्हणून ग्रामीण भागातील महिलांना गोधडीच्या माध्यमातून शिवण्याचे काम देण्याची कल्पना विनय यांना सूचनी. 


या महिलांना रंगसंगती व आकर्षक अशा कपड्यांचा वापर कसा करता येईल, याचा विचार मांडत ही संकल्पना विकसित केली आहे. या गोधडी पारंपरिकतेतही आधुनिक संगम साधून कसे देखणे करता येईल याचा सल्ला विनय देतो. वळसंग व आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू असून सध्या विनयकडे २० महिला हे काम करत अाहेत. 


सोलापुरी गोधडीला राज्यात सर्वाधिक आहे मागणी 
सोलापुरी गोधडीला राज्यात आणि राज्याबाहेरही खूप मागणी आहे. सोलापुरी हातांनी टाके घातलेली गोधडी ही उत्तम सांभाळ केला तर ४० वर्षांहून अधिक काळ टिकते. साड्या, छोट्या कपड्यांचे तुकडे अशा मिश्रणाने ही गोधडी तयार केली जाते. ज्यांचे आई, सासू, आजी या हयात नसतात अशा कुटुंबात त्यांच्या जुन्या साड्या अस्तित्वात असतात. त्या आठवणी रूपाने घालत असल्याने त्या कुणाला देऊही केल्या जात नाहीत. अशा गोधडी त्या साड्या जोडून त्यांची छान आठवण जपल्या जातात. अनेक जणी अशा प्रकारच्या साड्या देऊन गोधडी तयार करताना पाहायला मिळत आहेत. 


पारंपरिक वस्त्रांना जपण्याचा प्रयत्न 
साठीनंतर महिलांचे कौटुंबिक जीवनातील महत्त्व कमी होते. सोलापूरच्या ग्रामीण भागातील महिला गोधडी ही खूप सुंदर शिवतात. शिवाय हा पारंपरिक वस्त्रप्रकार आहे. या कलेची ही जपणूक व्हावी असे दोन हेतू आहेत. या कामाचे खूप काैतुक होत आहे, याचे समाधान वाटते. 
- विनय नारकर, डिझायनर 

बातम्या आणखी आहेत...