आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आर्यन'ताब्याचा वाद, कारखाना आणि तहसीलदारांना बजावल्या नोटिसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर. खामगाव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगरचा ताबा जिल्हा बँकेकडे देण्याविषयी कारखाना आणि तहसीलदारांनी तीन अाठवड्यात म्हणणे द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. या दोन्ही घटकांना नोटिसा काढल्या. त्यामुळे पंढरपूरच्या विजय शुगरचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर आता आर्यनचा ताबाही दृष्टिपथात आला. त्यामुळे बँकेला दिलासा मिळाला. 


आर्यन या खासगी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १३१ कोटी रुपयांचे कर्ज दिले. दोन-तीन हंगाम झाल्यानंतर कारखाना अडचणीत आला. त्यानंतर कारखान्यातील उत्पादनच बंद झाले. शेतकऱ्यांची ऊस बिले थकली. जनहित शेतकरी संघटनेने केलेल्या जनअांदोलनाच्या रेट्यामुळे साखर आयुक्तांनी कारखाना ताबा घेतला. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानेही या कारखान्यावर ताबा सांगितला. 


परंतु बँकेने कर्जपुरवठा करताना कारखान्याची संपूर्ण मालमत्ता गहाण ठेवून घेतली. कर्ज थकीत झाल्यानंतर रीतसर नोटिसा धाडून 'सिक्युरिटायझेशन अॅक्ट'खाली मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला. प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी 'सरफेसी' कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. तिथे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या रकमांचा प्रश्न होता. बँकेने त्याचीही जबाबदारी घेतली. परंतु जिल्हा प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने बँकेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. 


न्यायमूर्ती जे. सय्यद आणि न्या. जे. ए. चलय्या यांच्या खंडापीठापुढे सोमवारी याबाबत सुनावणी झाली. कारखाना आणि बार्शीचे तहसीलदार या प्रकरणात वादी असल्याने त्यांचे म्हणणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. आजपासून ३ आठवड्यात म्हणणे द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच दोन्ही घटकांना म्हणणे देण्यास २ एप्रिलपर्यंत मुदत आहे. 


'विजय'च्या धर्तीवरच न्यायालयीन लढाई 


करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर आणि आर्यन शुगर या दोन्ही कारखान्यांच्या उभारणीसाठी जिल्हा बँकेने कर्जे दिली. ती थकल्याने बँकच अडचणीत आली. दोन्ही कारखान्यांचा ताबा मिळण्यासाठी बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा केला होता. परंतु न्यायालयीन प्रक्रियेतूनच विजय शुगरचा ताबा मिळाला. आताही त्याच धर्तीवरची ही न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. 
१९१ कोटी मिळतील 
Ãआर्यन शुगरला १३१ कोटी मुद्दल रुपये दिले. त्यावर आतापर्यंतचे ६० कोटींचे व्याज झाले. दोन्ही मिळून १९१ कोटी रुपये बँकेला येणी आहे. त्याचा ताबा मिळाला, की लिलाव करून ही रक्कम मिळवता येईल. विजय शुगरच्या मालमत्तेचाही लिलावच करायचा आहे. राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

बातम्या आणखी आहेत...