आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपयशाने स्वत:वरचा विश्वास डळमळीत झाला होता, संयम महत्त्वाचा ठरला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाचव्या प्रयत्नात हे यश मिळाले. दरम्यान, स्वतःवरचा विश्वास डळमळीत होत होता. मात्र, आई-वडिलांसह मित्रांनी दिलेली साथ आणि संयम महत्त्वाचा ठरला, असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ८७६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले कोर्टी येथील अविनाश चव्हाण यांनी व्यक्त केले. करमाळा येथे आले असता त्यांनी दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधला. 


चव्हाण म्हणाले, माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. मिळालेल्या पदाचा वापर तळागाळातल्या लोकांच्या सुधारणेसाठी करण्यावर भर देणार आहे. तसेच, जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत स्पर्धा संपत नाही. त्यामुळे जिंकण्यासाठी लढा. ध्येय गाठण्यासाठी अभ्यास आणि प्रयत्न सुरू ठेवल्यास यश मिळेल. मराठी माध्यमही उपयुक्त असू शकते, परंतु इंग्रजी माध्यमातूनच अभ्यास करा. 


यावेळी त्यांचे वडील सुंदरदास चव्हाण, आदिनाथचे माजी संचालक दशरथ कांबळे, नागेश कांबळे, लक्ष्मण भोसले, डॉ. राजदत्त कांबळे, प्रा.भीष्माचार्य चांदणे, सचिन अब्दुले, अमोल कांबळे, प्रफुल्लकुमार दामोदरे आदी उपस्थित होते. 


टिकलात तरच जिंकाल, आत्महत्या पर्याय नव्हे 
अपेक्षित यश न मिळाल्यास नैराश्य येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याविषयी चव्हाण म्हणाले, अपयश मिळाल्यास ते का मिळाले? यशासाठी काय करावे लागेल? याचा विचार केला पाहिजे. आत्महत्या हा काय पर्याय असू शकत नाही. पण जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपली लढाई संपली नाही, हे लक्षात ठेवावे. जिंकण्यापेक्षा टिकणे महत्त्वाचे असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. 

बातम्या आणखी आहेत...