आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक, थर्माकोलच्या ताट, वाट्या, ग्लासवरही येणार बंदी; सरसकट बंदीचे धोरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर २०१६ मध्ये अादेश काढून बंदी घातली. तेव्हापासून प्लास्टिकमुक्तीची शहरात मोहीम चालू अाहे. पण तरीही प्लास्टिकचा वारेमाप वापर अाणि विक्री सुरू अाहे. कारवाई कडक करण्यावर भर देण्याएेवजी अाता शासनाने पुन्हा २ जानेवारी रोजी नवीन अादेश काढून प्लास्टिक आणि थर्माकोलपासून तयार होणाऱ्या ताट, कप, ग्लास, वाट्या, चमचे अादी सर्व वस्तूंवर बंदी घालण्याच्या अनुषंगाने पाऊल उचलले अाहे. हा अादेशही संभ्रम निर्माण करणारा अाहे.


प्रस्तावित निर्बंधातील वस्तू
प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या पिशव्या, थर्माकोलपासून तयार होणारे ताट, प्लेट्स, ग्लास, वाटी, चमचा, बॅनर्स, तोरण, प्लास्टिक शिट्स सर्व प्रकारचे प्लास्टिक वेस्टर्न आदींच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्रीवर राज्यात निर्बंध घालण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या पत्रात म्हटले आहे.

 

जप्त केलेल्या कॅरिबॅगपासून रस्ता
महापालिकेने आतापर्यंत सुमारे दोन हजार किलो प्लॅस्टिक जप्त केले. त्यातून शहरात माॅडेल रस्ता करण्यात येणार असल्याचे मनपाचे म्हणणे अाहे. पण प्रत्यक्षात भोगाव येथील कचरा डेपोत मागील २५ वर्षांपासूनचे कॅरिबॅग पडून आहेत. त्या कॅरिबॅगचे काय? याबाबत महापालिकेने निर्णय घेतलेला नाही. रोज सुमारे पाच टन कचरा संकलित होतो अाहे. 

बातम्या आणखी आहेत...