आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांचा रॅलीत रोष, 2 दिवस बँका बंद राहणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पगारवाढी संदर्भात सरकारचे धोरण चुकीचे अाहे. याबाबत सरकारने कर्मचाऱ्यांचा योग्य विचार करावा, अशा विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी दुपारी शहराच्या काही प्रमुख भागातून रॅली काढण्यात आली. या रॅलीतून सरकार विरुद्ध रोष व्यक्त केला.

 

बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस संप असल्यामुळे बँकांचे व्यवहार बंद झाले आहेत. महिनाअखेर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे बँकेत पगार होणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. तसेच विक्रेते, व्यापाऱ्यांचे व्यवहार थांबणार असल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे.

 

युनियनच्या रॅलीची सुरुवात बाळीवेस येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथून बुधवारी दुपारी ११ वाजता करण्यात आली. बाळीवेस येथून टिळक चौक, कोंतम चौक, चाटी गल्ली मार्गे येऊन पुन्हा बाळीवेस येथेच या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये 'सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा धिक्कार असो', 'कर्मचाऱ्यांना पगार वाढ झालीच पाहिजे', 'बँकांत नोकरभरती झालीच पाहिजे', 'मोठ्या कर्जबुडव्यांना अटक करा', 'बड्या थकीत कर्जदारांची नावे जाहीर करा' अशा मागण्यांचे फलक घेऊन बँकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सर्वजण हम सब एक है चा नारा देत होते.

 

देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी बुधवारी संपावर गेले. यामुळे सर्व बँका बंद राहिल्या. याचा फटका बँकिंग व्यवसायाला आणि मध्यमवर्गीय नागरिकांना झाला. काही एटीएममध्ये दुपारपर्यंत तर काही बँकांमध्ये सायंकाळपर्यंत कॅश होती. नंतर मात्र नागरिकांची हैराणी झाली. बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीविषयी वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या होऊनही सरकारने फक्त दाेन टक्के पगार वाढ देऊ अशी भूमिका घेतली. यामुळे बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या ९ संघटनांनी एकत्र येऊन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची स्थापना केली. याच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरली.


सुमारे साडेतीन हजार कर्मचारी आंदोलनात
सोलापूर जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा सुमारे चारशे असतील. या सर्व शाखांमधील सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचारी संपावर गेले आहेत. दोन दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. साधारण एक हजार एटीएम आहेत. आम्ही जी रक्कम भरली होती ती बुधवारी दुपार किंवा सायंकाळपर्यंत संपेल. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कडकडीत संप पुकारला आहे.
- प्रसाद अतनूरकर, जनरल सेक्रेटरी, बँक ऑफ ऑफ महाराष्ट्र ऑफिसर असोसिएशन

बातम्या आणखी आहेत...