आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंद्रूपमध्ये कारहुणवीनिमित्त बैलांपुढे नाचवल्या बारबाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर- मंद्रूपमध्ये कारहुणवीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बारबालांना नाचवून धांगडधिंगा घालण्याचा किळसवाणा प्रकार घडला. याबद्दल जाणकार शेतकरी व महिलावर्गांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 


कारहुनवी सण म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा सण. पवित्र गाय व बैलांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा सण. वर्षभर बळीराजाच्या शेती कामात मदत करणाऱ्या सर्जा-राजा व आर्थिक समृध्द करणाऱ्या गोमातेला अभिवादन करून त्यांची गावातून सजवून मिरवणूक काढण्यात येते. यादिवशी बैलांना आरास करून त्याची सहकुटुंब मनोभावे पूजा केली जाते. वर्षभर बळीराजाला साथ देणाऱ्या सर्जाराजाबद्दल ऋण व्यक्त करण्यात येते. गावातील निष्ठावंत शेतकरी उत्साहात सण साजरा करतो. पण मागील काही वर्षांपासून मंद्रूप गावात कारहुणवीनिमित्त काढण्यात येणाऱ्या बैलांच्या मिरवणुकीत विचित्र हावभाव करणाऱ्या बारबाला नाचवण्याचा प्रकार घडत आहे. ज्या गाय-बैलांना देव म्हणून पूजले जाते. त्यांच्या समोर अश्लील हावभाव करणाऱ्या व थिल्लरपणा करणाऱ्या महिलांना नाचवणे सर्जा-राजाचा अपमान आहे. त्यामुळे धरणी आईची सेवा करणारे निष्ठावंत व मुरब्बी शेतकरी या मिरणुकीत स्वतःची पवित्र गाय व बैल नेण्याऐवजी स्वत:च्या शेतात विधिवत पूजा करीत आहेत. त्यामुळे कारहुणवी मिरवणुकीत शेतकऱ्यांऐवजी रसिक अधिक सहभागी होताना दिसत आहेत. 


पूर्वी या सणात गावातील सर्व बैल मिरवणुकीने एकत्र आणून गावतलावाच्या ठिकाणी हौस म्हणून बैलांच्या टकरी लावण्यात येत होत्या. मात्र पाच वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती असताना व शेतकऱ्यांना मिरवणूक काढणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसताना महागडा नृत्याचा प्रकार घडताना दिसून येत आहे. संस्कृती टिकवण्याऐवजी ती बिघडवण्याचे कृत्य होतोय. आज मंद्रूपच्या मिरवणुकीत रात्री नऊ वाजेपर्यंत बारबालांना नाचवले गेले. यामुळे जाणकार शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...