आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसह गाडी उचलून नेली, कारवाईची होणार चौकशी; शासकीय रुग्णालयात घडला होता प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शासकीय रुग्णालयातील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी अालेल्या व्यक्तीची दुचाकी क्रेनव्दारे उचलून नेण्यात अाली. त्यात कहर म्हणजे ज्या व्यक्तीची दुचाकी होती त्या व्यक्तीला व त्यांच्या शाळकरी मुलीला क्रेन वाहनावरून जेल रोड पोलिस ठाण्यातील पार्किंगमध्ये अाणून दंड भरून सोडून दिले. 


हा भयानक प्रकार मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमाराला घडला. याबाबत पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांना विचारले असता, या घटनेची नेमकी चौकशी करतो. काय प्रकार अाहे हे पाहून कुणी दोषी अाढळल्यास क्रेनवरील पोलिस, कर्मचारी यांच्यावर कारवाई करू असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या घटनेबाबत शनिवारी एक संघटना अांदोलन करणार असल्याची चर्चा अाहे. मेरगू नावाची एक व्यक्ती अापल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होती. त्याअगोदर महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर वाहतूक क्रेन अाली. त्यांनी धावत येऊन पोलिसांना दुचाकी सोडण्याची विनंती केली. मुलीला शाळेत न्यायचे अाहे, उशीर होईल म्हणून विनंती केली. पोलिस एेकण्याच्या स्थितीत नव्हते. मेरगू हेही गाडी द्याच म्हणून अाडून बसले. पोलिसांनी दुचाकी, मेरगू व मुलीसह क्रेन जेल रोड ठाण्यात अाणली. दंडाची पावती करून सोडून दिले. महालक्ष्मी मंदिराचा परिसर नो पार्किंग झोन अाहे. तरीही दुचाकी लागतात. 


पोलिसांचे काय चुकले... 
क्रेनवरून त्या दोघांना नेणे चुकीचे अाहे. जागेवरच दंड भरून दुचाकी दिली असती तर प्रश्न मिटला असता. नाहीतर रिक्षाने त्यांना जेल रोड पोलिस ठाण्याच्या पार्किंंगमध्ये येण्यास सांगणे गरजेचे होते. क्रेनवर कारवाई अगोदर माइकद्वारे सूचना देण्याचा नियम अाहे. सूचना दिली नसल्याचे सांगण्यात अाले. घटनेचे फोटो, व्हिडिअो क्लिप सोशल मीडियावर दिवसभर फिरत होती. पोलिसही नियमाने कारवाई करीत नाहीत. अाले मना केली कारवाई. नागरिकही नियम पाळत नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...