आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या उपोषणात खासदारांसह 2 मंत्री, संसदेत कामकाज होत नसल्याचा मुद्दा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे काम होऊ शकले नाही. यामुळे अनेक जनहिताची कामे रखडली आणि शासनाचे पैसे खर्च झाले, असा आरोप करत या गोंधळाविरुद्ध भाजपचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस उपोषण केले. यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी सहभाग नोंदवला.

 

सायंकाळी पाच वाजता उपाेषण संपले. उपोषणाची जागा अपुरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक कार्यकर्ते बाजूला उभे राहिले. तेथून वाहतूक सुरू असल्याने तेथे काही प्रमाणात कोंडी झाली. महापालिका सभागृह नेते संजय कोळी, उपमहापौर शशिकला बत्तुल, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, युवा माेर्चा अध्यक्ष वृषाली चालुक्य, श्रीनिवास दायमा, मोहन डांगरे, विक्रम देशमुख यांसह नगरसेवक, नगरसेविका आदी सहभागी झाले होते. दुपारी गर्दी कमी होत होती. पण खासदार बनसोडे आणि पालकमंत्री देशमुख दिवसभर होते.

 

इनकमिंग व आऊटगोईंग
उपोषणस्थळी दिवसभर भाजपचे कार्यकर्ते येत होते. सहकारमंत्री देशमुख हे सकाळी आले, दुपारी गेले. पालकमंत्री १० वाजता आले दुपारी एक तास गेले, पुन्हा आले, सायंकाळी चार वाजता गेले. पुन्हा सायंकाळी आले. ते संपेपर्यंत होते. काही नगरसेवक येत होते, जात होते. महापौर बनशेट्टी ११.१५ वाजता आल्या तर दुपारी गेल्या. मात्र, अॅड. बनसोडे पूर्ण दिवस बसून होते. ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपोषणस्थळी येत होते.

 

काँग्रेसचा धिक्कार
लोकसभेत जनहिताचा निर्णय होत असताना काँग्रेसच्या ४४ खासदारांनी गोंधळ घातला. कायदे होते ते तहकूब राहिले. अर्थसंकल्प अधिवेशनात राज्यांना पैसे देण्यासाठी मंजुरी आवश्यक असता, गोंधळ घातला. लोककल्याणाचे बिल अडवून लोकशाहीची पायमल्ली केली. त्यामुळे काँग्रेसचा धिक्कार करण्यासाठी उपोषण आहे.
- अॅड. शरद बनसोडे, खासदार

बातम्या आणखी आहेत...