आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषोत्तमपुरीत गोदापात्रात बोट उलटली; जालना जिल्ह्यातील २८ भाविक बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव (जि. बीड)-  पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर असलेल्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या जालना जिल्ह्यातील भाविकांची बोट गोदापात्रात उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. वेळीच मदत मिळाल्याने २८ प्रवासी बालंबाल बचावले. 


यात्रेनिमित्त पैठणच्या नाथसागरातून पात्रात पाणी सोडलेले आहे. सोमवारी परतूर तालुक्यातील रेवलगाव, रामनगर येथील २८ भाविक दर्शनासाठी बोटीतून पुरुषोत्तमपुरीला आले होते. परत जात असताना अप्रशिक्षित चालक आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने बोट उलटली. पोलिस, स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...