आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचेच्या चौकशीसाठी लाच;मंत्रालयीन सचिवासह 2 अटकेत, 25 हजार रुपयांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

धुळे- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर खात्यांतर्गत चौकशीचा अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारे मंत्रालयीन सहसचिव प्रभाकर पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पवार यांच्यातर्फे लाच स्वीकारणारा खासगी व्यक्ती प्रशांत गवळी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.     


सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता  विनोद अर्जुन वाघ यांच्यावर  पाच वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.  हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तर वाघ यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. मंत्रालयीन सहसचिव तथा विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशी अधिकारी प्रभाकर बाबूराव पवार यांच्याकडे हे प्रकरण आहे. चौकशीचा अंतिम अहवाल देण्यासाठी प्रभाकर पवार यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर ही रक्कम  प्रशांत सुभाष गवळी याच्याकडे देण्यास सांगितले हाेते.याबाबत वाघ यांनी एसीबीकडे तक्रार दिली हाेती.

 

पवारकडे १५० चौकशीची प्रकरणे
प्रभाकर पवार यांच्याकडे  १५० प्रकरणांची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. त्यामध्ये वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय आठ डीवायएसपींचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे अभियंता वाघ यांच्या प्रमाणे इतरांकडूनही अशा पद्धतीने पवार यांनी लाच मागितली असावी असा संशय एसीबीने व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...