आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुबळी इंटरसिटी रद्द करून मुंबईसाठी गाडी सुरू करा; प्रवासी संघटनांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर- हुबळी इंटरसिटी एक्स्प्रेस ही दररोज धावणारी रेल्वे गेल्या अनेक दिवसांपासून तोट्यात धावत आहे. गाडीला ९ डबे मात्र या डब्यात संपूर्ण सोलापूर ते हुबळी थेट प्रवास करणारे वीस ते पंचवीस प्रवासीही नसतात. काही प्रवासी विजापूरपर्यंत प्रवास करतात तर काही प्रवासी विजापूर ते गदग असा प्रवास करतात. असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हाताच्या बोटावर मोजणारी इतकीच. सोलापूर ते हुबळी असा ३५८ किमीचा प्रवास करणाऱ्या या रेल्वेचा एका दिवसाचा खर्च लाखो रुपये आहे. तर दुसरीकडे प्रवासी तिकिटातून अवघे एक हजार ते दोन हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असेल. तोट्यात धावणाऱ्या या रेल्वेला सोलापूर ते हुबळी चालविण्याएेवजी सोलापूर ते पुणे अथवा सोलापूर ते मुंबई चालविली तर प्रवाशांची सोय तर होईलच शिवाय रेल्वेचे उत्पन्नही वाढेल. 


गेल्या अनेक दिवसांपासून या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद नाही. हुबळीवरून सोलापूरला येताना तर परिस्थिती आणखीनच गंभीर असते. प्रत्येक डब्यात एक किंवा दोन प्रवासी असतात. शिवाय या गाडीचे ८ डबे हे जनरल दर्जाचे असतात. परिणामी त्यांना वेसटिबूल नसल्याने प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी मार्गच नसतो. गाडी फलाटावर अथवा क्रॉसिंगला थांबल्यानंतर प्रवाशांना डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात जावे लागते. यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकदा आरपीएफ रेल्वेतील सर्वच प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव एकाच डब्यात बसवितात. साधारण सोलापूर ते हुबळी एका खेपाचा खर्च हा अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचा येतो. प्रवासी उत्पन्न मात्र हजारात असते. तेव्हा ही गाडी तोट्याच्या मार्गावर धावण्याएेवजी सोलापूर ते पुणे अथवा सोलापूर ते मुंबई सोडावी. ही गाडी सोलापूरहून मुंबईला व्हाया पनवेल सोडली तर सोलापूरकरांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होईल. 


विरोध असेल तर हुबळी ते मंुबई गाडी सुरू करा 
सोलापूर ते हुबळी एक्स्प्रेसच्या आधीच सोलापूरहून मुंबई -गदग एक्स्प्रेस धावते. त्यामुळे प्रवाशांसाठी हा चांगला पर्याय आहे. या गाडीला पहिल्यापासून प्रतिसाद नाही. रेल्वे प्रशासनाने ही गाडी बंद करून पुणे व मुंबईच्या मार्गावर सोडावी. हुबळी विभागाचा यास विरोध असेल तर त्यांनी हुबळी -मुंबई गाडी सुरू करावी.
- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर 

बातम्या आणखी आहेत...