आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दीडपट हमीभाव'ही शेतकऱ्यांची फसवणूक; खासदार राजू शेट्टी यांचा सोलापूर येथे आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दीडपट हमीभावाची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. कारण गेली दोन वर्षे तूर व हरभऱ्याची हमीभावाने खरेदी झाली. पण त्याचे पैसे सरकारनेही दिले नाहीत. जीएसटीमुळे सध्या रासायनिक खतांच्या िकमतीत वाढ झाली आहे. डिझेलचे दर वाढल्याने शेती मशागत खर्चात वाढ झाली आहे. शिवाय मजुरी व इतर साहित्यांच्या वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. 


राज्यात १६ जुलैपासून दूध बंद आंदोलन 
शेतकरी संघटनांनी वारंवार मागणी करूनही राज्यात दुधाला दर मिळत नाही. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान व उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात १६ जुलैपासून दूध बंद आंदोलन करणार असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...