आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर मंदिर परिसरातील स्मार्ट सिटीच्या कामात बदल, परवानगीसाठी पुरात्तत्व खात्याकडे प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलाव सुधारणा करण्यात येणार आहे. त्यातील आराखड्यात पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार बदल करून, अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

 

सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुधारणा करण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार ३०० मीटर परिसरात बांधकाम करायचे असल्यास परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे अनावश्यक काही भाग ३०० मीटरच्या बाहेर लक्ष्मी भाजी मंडई परिसरात नेण्यात आला आहे. मंदिर परिसरात ७ वेगवेगळ्या प्रकारचे उद्यान असणार आहेत. मूळ आराखड्यात ३० टक्के कपात करून सुधारणा करण्यात आल्या. त्यात बाकडे, सिमेंट कमान आदी कामांचा समावेश आहे. मंदिर परिसरात करण्यात येणाऱ्या कामाचे नियोजन करून त्यास पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवले आहे. मंजुरी आल्यावर निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली.


परिसरातील  कामाचे काय?
स्मार्ट सिटी योजनेतून इंदिरा गांधी स्टेडियम येथे सौर ऊर्जा प्रकल्पाची योजना आहे. पण त्यास पुरातत्त्व विभागाकडून परवानगी मिळत नसल्याने काम थांबले आहे. त्या कामाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...