आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी सोलापूरला संमेलनात दिले आश्वासन; लिंगायतांना आेबीसी प्रमाणपत्राचा लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आेबीसी आयोगापुढे अडचणी मांडून वीरशैव लिंगायत समाजाला आेबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे प्रयत्न राहतील. शिवाय मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाचा निर्णय पुढील पंधरा दिवसांत घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. बृहन्मठ होटगी संस्थेच्या संकल्पसिद्धी कार्यमहोत्सवात ते बोलत होते. 


अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिर परिसरात शुक्रवारी वीरशैव लिंगायत संमेलन झाले. श्रीशैल्य मल्लिकार्जुन लिंगोद््भव १००८ जगद््गुरू पंडिताराध्य भगवद््पाद यांची १०८ फूट उंच मूर्ती आणि १४ फूट नंदीश्वर मूर्तींचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील दोन्ही मुद्दे विसरले होते. नंतर सूत्रसंचालकांंना थांबवून त्यांनी, लिंगायत समाजाला आेबीसींचा दर्जा द्या आणि बसवेश्वर स्मारकाविषयी निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांच्या या दोन्ही मागण्यांना अनुमाेदन देत, पंकजा मुंडे यांनी या दोन्ही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या हातूनच घडतील, असे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...