आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविका मेनका राठोडांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकास मारहाण केल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप माने यांचा प्रचार केल्यामुळे एकाला मारहाण झाल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिसांत दाखल झाली. 


नगरसेविका मेनका राठोड यांच्या पापाराम नगरातील घरात नेऊन निवडणुकीच्या कारणावरून पाचजणांनी लाकडी स्टंप, दांडक्याने मारहाण केेल्याची फिर्याद अशोक कनोराम चव्हाण (वय ४२, रा. गणेश निर्मिती लॉन, राजस्वनगर) यांनी दिली. मारहाणीची ही घटना ४ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता पापाराम नगरातील मंत्री- चंडक रेसिडेन्सी येथे नगरसेविका मेनका राठोड यांच्या घरात घडली. यात शिवराज रेवणसिद्ध राठोड, रवी तुकाराम जाधव, दीपक राठोड, संजय धर्मा पवार, मेनका राठोड, सर्व रा. मंत्री-चंडक रेसिडन्सी, पापाराम नगर, विजापूर रोड यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...