आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सोपल यांच्या सभेत गोंधळ; थेट व्यासपीठावर चढून भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी- बार्शी बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी उपळे दुमाला येथे आयोजित आमदार दिलीप सोपल यांच्या जाहीर सभेत गोंधळ झाला. शुक्रवारी (दि. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. सभेत व्यत्यय आणून आमदार सोपल यांना अपशब्द वापरलेल्या संशयिताचे नाव शिंदे असल्याचे सांगितले जात आहे. 


आमदार सोपल सभेत बोलताना व्यासपीठाजवळ बसलेल्या शिंदे नावाच्या इसमाने थेट त्यावर चढून भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न करत सोपल यांना अपशब्द वापरले. त्यावेळी उपस्थित सोपल समर्थकांनी त्याला पकडून चोप दिल्याची माहिती समजते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सभा संपली. यावेळी सोपल यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर सोशल माध्यमातही सोपल समर्थकांनी या प्रकाराचा निषेध केला. घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत वैराग पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नका. मला काहीही झालेले नाही. भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला. तो विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे आणि मनाचा तोल ढासळल्याचे लक्षण आहे. सोशल माध्यमावरील खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आमदार सोपल यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...