आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या सर्वोच्च कार्यकारिणीतून शिंदेंना डावलल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसच्या सर्वोच्च कार्यकारिणीतून वगळल्याने सोलापुरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर गुरुवारी सकाळी निर्दशने केली. यानंतर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याकडे सामूहिक राजीनामे सोपवले. कार्यकर्त्यांनी “कहो दिल से, शिंदेसाहेब फिरसे, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. 


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यसमितीची घोषणा नुकतीच केली. यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करून घेण्यात आले. कार्यरिणीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना संधी न दिल्याने काही नाराज समर्थकांनी या वेळी गोंधळ घालून काँग्रेस भवनातील शोभेची झाडे लावलेल्या कुंड्या फेकून निषेध व्यक्त केला. विनोद भोसले, सैफन शेख, राहुल गोयल, राहुल वर्दा, विवेक कन्ना, कासिम नालबंद, जुबेर कुरेशी, तिरूपती परकीपंडला, बाबा करगुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनाम्याचे पत्र सोपवले आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सुशीलकुमार शिंदे यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी होती.

बातम्या आणखी आहेत...