आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग काचा असलेल्या रेल्वे डब्यांची निर्मिती; केवळ 40 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - चेन्नई येथील आयसीएफ डब्यांच्या कारखान्यात सलग काचा असणाऱ्या डब्यांची निर्मिती केली जात आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एका डब्याची निर्मिती झाली असून याला रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच टू व थ्री टिअर वातानुकूलित डबे नेहमीसारखे न बनवता ते याच पद्धतीने बनवले जाणार आहेत. वर्षभरात सुमारे ४०० डब्यांची या पद्धतीने निर्मिती केली जाणार आहे.

 

विदेशात प्रवाशांना बाहेरील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता यावा या हेतूने रेल्वे डब्यांना दोन्ही बाजूच्या काचा सलग असतात. भारतीय रेल्वेमध्ये वातानुकूलित डब्यांना कंपार्टमेंटनुसार काचा बसवलेल्या असतात. त्या सलग अशा नसतात. भारतातील प्रवाशांनादेखील बाहेरील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटता यावा या हेतूने भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच सलग काचा असणाऱ्या डब्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. प्रायोगिक तत्त्वावर एक डबा तयार झाला आहे. पुढील महिन्यापासून टू व थ्री टिअर डब्यांची निर्मिती याच पद्धतीने करण्यात येणार आहे.

 

यापूर्वी पारदर्शक छत असलेल्या विस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर रेल्वेने सलग काचा असलेल्या डब्यांच्या निर्मितीवर भर दिला आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाला केवळ ४० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...