आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी न घेता मंदिरात बांधकाम; धर्मराज काडादी यांच्यावर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पुरातत्व विभागाची परवानगी न घेता श्री सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यासमोर बांधकाम केल्याप्रकरणी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यावर बुधवारी रात्री फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भुईकोट किल्ल्याच्या पश्चिम क्षेत्रात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यासमोर बांधकाम करण्यात आले आहे. मात्र हे करताना मंदिर समितीने पुरातत्व विभागाची परवानगी घेतली नाही. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र आहे. परवानगीविना बांधकाम केल्याची फिर्याद पुरातत्व विभागाचे हरीस जीवनलाल ससरे (वय ४२, रा. औरंगाबाद, सध्या भुईकोट किल्ला) यांनी फिर्याद दिली. 

बातम्या आणखी आहेत...