आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर अफवा; सायबर सेलची करडी नजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर स्थानिक पोलिस स्टेशन व सायबर सेल पथकाची नजर आहे. लहान मुले पळविणारी टोळी आली, महापुरुष, राजकीय तेढ वाढविणारी माहिती कोणी सोशल मीडियावर शेअर करीत असेल तर त्यावर पोलिस पथक नजर ठेवून आहे.

 

राज्यात अनेक ठिकाणी मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा उठल्या आहेत. काही लोकांवर हल्लेही झाले. या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनीही काळजी घेतली आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे निवेदन यापूर्वीच पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा उपायुक्त, गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दीस दिले आहे. नागरिकांनाही माहिती देण्याचे आवाहन केले आहे. सोलापुरात सध्या अशा सोशल मीडियावर काही घटना आढळल्यास सायबर सेल व स्थानिक पोलिस स्टेशन संयुक्तपणे काम करून माहिती घेत आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अफवांचे पेव कमी झाल्याचा दावा सायबर सेलच्या प्रमुख फौजदार मधुरा भास्कर यांनी केला.

 

बातम्या आणखी आहेत...