आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅटेल पराॅडाइजमध्ये डान्सबार, 8 तरुणींसह तेराजण ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुणे रस्ता केगाव येथील हाॅटेल पराॅडाइज येथे डान्सबारमध्ये संगीत अाॅर्केस्ट्राच्या नावाखाली तरुणींचे तोकड्या कपड्यातील नृत्य सुरू असताना रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमाराला कारवाई झाली. हाॅटेलचालक, वेटर, अाठ तरुणींसह तेरा जणांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडल्याची माहिती फौजदार चावडी पोलिसांनी दिली.


पोलिस नाईक निशिकांत जोंधळे यांनी तक्रार दिली अाहे. हाॅटेल चालक सचिन जाधव, रोहित राहुल गायकवाड, किशोर अर्जुन बासपोर, जय मोतीलाल हलदार यांच्यासह अाठ तरुणांनी ताब्यात घेण्यात अाले अाहे. अाॅर्केस्ट्रा बारमध्ये नृत्य करण्यास बंदी असताना अाठही तरुणी तोडक्या कपड्यात अश्लील नृत्य करीत होते. महिला गायिकांचाही यात सहभाग अाहे. कारवाई दरम्यान नऊ हजार ८०० रुपये सापडले अाहेत. विनापरवाना बार चालू ठेवला. संगीत अाॅर्केस्ट्राच्या नावाखाली तरुणी नृत्य करीत होत्या. तसेच हाॅटेल बंद करण्याची वेळ पाळली नाही. या सगळ्या अटींचा भंग केल्यामुळे ही कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली अाहे. पोलिस निरीक्षक शहाजी पवार तपास करीत अाहेत.

 

तक्रारीनंतरही उशिरा कारवाई
विशेष म्हणजे या हाॅटेलात अनेक दिवसांपासून संगीत अाॅर्केस्ट्राच्या नावाखाली नृत्याचा हा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे अाल्या होत्या. मग, पोलिसांना अाजपर्यंत ही माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून सातत्याने हाॅटेलची तपासणी करणे गरजेचे असताना तसे होत नाही. नियमाचे पालन होते का?, हाॅटेल जास्त वेळ चालू असेल तर बंद करण्यासाठी सूचना दिल्या जात नाही. तपासणी, चौकशी, पाहणी करणे संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांचे काम असते. पण, सक्षमपणे काम होत नाही.

बातम्या आणखी आहेत...