आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दराेडेखाेरांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू, एक गंभीर;साेलापूर जिल्ह्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- कर्नाटकच्या सीमेजवळ असणाऱ्या सोड्डी (ता. मंगळवेढा) या गावात गुरूवारी मध्यरात्री दराेडेखाेरांनी धुमाकूळ घालत पाच घरे फाेडली. तसेच प्रतिकार करणाऱ्यांवर शस्त्राने व दगडाने प्राणघातक हल्ला केला, यात कस्तुराबाई रामाण्णा बिराजदार  (६५) यांचा मृत्यू झाला तर  मलक्काप्पा रेवगोंडा बिराजदार (६०) हे गंभीर जखमी झाले. या घरांतून नेमका किती एेवज चाेरीस गेला याची माहिती अद्याप केलेली नाही.


या गावातील बहूसंख्य लाेक सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी गेल्याने घरांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकेच हाेती. ही संधी साधून दराेडेखाेरांनी गावात डल्ला मारला. डोळ्याचे ऑपरेशन झालेल्या कस्तुराबाई गुरूवारी रात्री घरातील अातल्या खाेलीत झाेपल्या हाेत्या. मध्यरात्री दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कस्तुराबाईच्या गळ्यातील १५ हजार रूपये किमतीचे अर्धा तोळे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून घेतले. त्यांनी प्रतिकार केला असता दराेडेखाेरांनी त्यांच्या छातीवर, पाठीवर, डाेक्यावर शस्त्राने गंभीर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा शेजारच्या घराकडे वळवला. त्यांचा अावाज अाल्यामुळे घरमालक मलक्काप्पा बिराजदार जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता दराेडेखाेरांनी त्यांना दगडाने बेदम मारहाण केली. यात मलक्काप्पा गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू अाहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळचे ७ वाजले तरी आजी चहा पिण्यास कशी येई ना? म्हणून नात कस्तुराबाईच्या खाेलीकडे गेली असता तिला अाजी रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या दिसून अाल्या. हे दृश्य पाहून भेदरलेल्या अवस्थेत ती किंकाळ्या फोडत धावत अाली व ही घटना वडिलांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार सर्वांना कळाला. त्यानंतर मुलाने पाेलिसांकडे फिर्याद दिली.

 

हद्दीच्या वादातून शवविच्छेदनास टाळाटाळ

कस्तुराबाई यांचा मृतदेह शुक्रवारी मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात अाणण्यात अाला. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी साेड्डी हे गाव या रुग्णालयाच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याची मृतांच्या नातलगांची तक्रार अाहे. त्यामुळे नातेवाइकांना ग्रामीण रुग्णालयात जवळपास तीन तास ताटकळत बसावे लागले. अखेर अामदार भारत भालके यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना याबाबत फाेनवरून माहिती दिली, त्यानंतर शवविच्छेदन करण्यात अाले.

बातम्या आणखी आहेत...