आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतभेद विसरून एकत्रित काम करण्याचा काँग्रेस नेत्यांचा निर्धार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर- विकासकामे असो की निवडणुका आता आम्ही सर्व नेत्यांंनी एकत्रित काम करण्याचा निर्धार केला आहे. गट-तटाचा आता विषयच नाही. तालुका काँँग्रेसचाच बालेकिल्ला राहील, असा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांंनी व्यक्त केला. 


अकोले (मंंद्रूप) येथे रविवारी विविध विकासकामांंचे भूमिपूजन व उद््घाटन झाले. त्यावेळी माने बोलत होते. आमदार सिद्धाराम म्हेत्रे अध्यक्षस्थानी होते. या वेळी दलित वस्ती व मारुती मंंदिर भागातील सिमेंंट रस्त्यांंचे भूमिपूजन, भूमिगत गटार, पेव्हर ब्लाॅॅक बसवणे, व अंंगणवाडी इमारतीचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा बँँकेचे संंचालक सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, गोपाळराव कोरे, बजरंंग मेकाले, जयहिंंद कारखान्याचे अध्यक्ष बब्रुवान माने, प्रवीण देशपांंडे, संंयोजक रमेश आसबे, मंंद्रूपचे उपसरपंंच अल्लाउद्दीन शेख, सुभाष पाटोळे, संंजय गायकवाड, आनंंदराव कोले, बाळासाहेब पाटील, उपसरपंंच हणमंंत पवार, कमलाकर पाटील, रकमाजी पाटील, विकास पाटील, शैलेश गायकवाड, बजरंंग कदम व नीलेश पाटील उपस्थित होते. आमदार म्हेत्रे म्हणाले, दक्षिण तालुक्याचे काँँग्रेस नेत्यांंनी नेतृृत्व केले. अनेक विकास कामे केली. पण काही चुका झाल्याने विरोधकांंच्या हातात सत्ता गेली. पण आता यापुढे असे होणार नाही. काँँग्रेसचे सर्व नेते मनापासून एकत्र आलेत. जनतेलाही पश्चाताप होतोय. त्यामुळे काँग्रेसकडूनच तालुका पुन्हा वैभवशाली होईल. हसापुरे म्हणाले, अकोले गावाला जिल्हा बँँक व जिल्हा परिषदेकडून निधी दिला. शेतकऱ्यांना मदत करताना अकोलेचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम केले. रमेश आसबे यांंनी गावातील विकासकामांंची माहिती दिली. कार्यक्रमास परिसर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. 


रमेश आसबेंंच्या पाठीशी सर्व नेते 
रमेश आसबे यांंच्या पत्नीला पंंचायत समितीत पराभव पत्करावा लागला. पण आसबे यांंच्याकडे चांंगले नेतृृत्वगुण आहे. त्यामुळे आगामी काळात काँँग्रेसचे सर्व नेते त्यांंच्या पाठीशी राहतील. विकासकामाला मदत करतील, असे माजी आमदार माने, म्हेत्रे व हसापुरे यांंनी सांंगितले. 

बातम्या आणखी आहेत...