आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांना भुलू नका, विश्वासघात विसरू नका; सहकारमंत्री देशमुख यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर- विरोधकांना रात्री येऊन पाय धरण्याची सवय आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांनी या पूर्वी केलेला विश्वासघात विसरू नका, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांना केले. मी तुमच्या रक्ताच्या नात्याचा असून तुमची पक्षीय अडचण होत असल्यास मुलाला माझ्याकडे द्या, अशी भावनिक साद त्यांनी घातली. शुक्रवारी (दि. २३) बीबीदारफळ येथे दोन कोटी ५६ लाखांच्या विकासकामांची सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी ते बाेलत होते. 


सहकारमंत्री देशमुख यांनी विरोधक विश्वासघातकी असल्याचा आरोप करत आगामी बाजार समिती निवडणुकीत भाजपची साथ न सोडण्याचे साठे यांना आवाहन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी लवकरच राजकीय सुगी येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असे सांगितले. याप्रसंगी आठवडा बाजार, ग्रामपंचायत संकुल, दलित वस्ती, सिमेंट बंधारे, हायमास्ट दिवे आदी कामांचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, उपसभापती रजनी भडकुंबे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ शिंदे, श्रीमंत बंडगर,भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, अकोलेकाटीचे सरपंच भाऊसाहेब लामकाने, अनिकेत पिसे, नितीन गरड, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील, सरपंच बेबीताई गाडे, 'छावा'चे अमोल पाटील आदी उपस्थित होते. 


माहिती अधिकार रद्द करण्याची मागणी 
कार्यक्रमात गावातील विरोधक माहिती अधिकार कायद्याचा वापर करत विकासकामात अडथळा आणत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. हाच मुद्दा पकडत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली. तसेच हा कायदाच रद्द करण्याची अजब मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली.

बातम्या आणखी आहेत...