आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवाडेंची लक्षवेधी स्वीकारली: ठिबक सिंचन अनुदान घोटाळा अधिवेशनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माळ शिरसतालुक्यातील ठिबक सिंचन अनुदान वाटपातील साडेदहा कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी विधान परिषदेचे आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे (नागपूर) यांनी मांडलेली लक्षवेधी विधानमंडळ सभापतींनी स्वीकारली. जिल्ह्यातील ठिबक सिंचन गैरव्यवहाराचे प्रकरण आता अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. 


ठिबक सिंचन अनुदान वाटपामध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांच्या समितीने केली. चाैकशी समितीने नोव्हेंबर महिन्यात अहवाल दिला. पण, त्या चौकशीत दोषारोप असलेल्या ३५ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करून गैरव्यवहाराची रक्कम वसुलीबाबत शासनाची भूमिका काय? असे प्रश्न आमदार कवाडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे गैरव्यवहारप्रकरणी कारवाईबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. 


कृषिभूषण सुरेश वाघधरे यांनी त्याप्रकरणी शासन, लोकायुक्तांकडे तक्रार केली. उर्वरित.पान १० 
त्याबाबतबोलताना वाघधरे म्हणाले,“एकूण ४२ अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी फक्त ३५ जणांवर ठपका ठेवण्यात आला. तत्कालीन कृषी अधीक्षक अशोक किरनळ्ळी यांचे नावे अाहे. पण, गैरव्यवहार घडलेल्या कालावधीतील कृषी अधीक्षक डी. एल. जाधव, श्री. तांबाडे, दिलीप झेंडे यांची नावे जाणीवपूर्वक वगळली आहेत. २३ कंपन्या, ७९ वितरकांसह, अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत तीन महिन्यांपूर्वी आदेश देऊनही कारवाई झाली नाही. त्याबाबत दुसऱ्यांदा स्मरणपत्रही देण्यात आले. पण, कंपन्यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी पत्र देईपर्यंत आयुक्तांसह संंबंधित अधिकारी गप्प बसल्याने त्यांचे कंपन्यांशी असणारे हितसंबंध स्पष्ट दिसून येतात, असेही वाघधरे म्हणाले.” 


तीन कृषी अधीक्षकांना निर्दोष दाखवण्यामागे कुणाचे हितसंबंध? 
कायद्यान्वयेसंबंधितकंपन्यांकडून गैरव्यवहाराची रक्कम वसुली, वितरकांचे परवाने रद्द करणे ठपका असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करून सर्वांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. चौकशीसाठी तिसऱ्या वेळेस इंगळे समितीची नियुक्ती केली. यापूर्वीच्या दोन्ही समित्यांनी दिलेला अहवाल चुकीचा असल्यास मग, त्यांच्यावरही कारवाई का केली नाही? गैरव्यवहार घडलेल्या कालावधीतील तीन कृषी अधीक्षकांना दोषी दाखवण्यामागे कुणाचे हितसंबंध आहेत? याबाबत स्पष्टता व्हावी. 
- सुरेश वाघधरे, कृषिभूषण, माळशिरस 

बातम्या आणखी आहेत...