आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मिळकतदारांना कचरा डबे वाटप सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील प्रत्येक मिळकतदारांना स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा संकलन डबा देण्यात येणार आहे. झोननिहाय डबे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांना डबे देण्यात आले आहे. महापालिका झोन क्रमांक १ व ७ येथे प्राथमिक स्वरूपात डबे वाटप स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले. 


घरातील आणि दुकानातील कचरा संकलन करण्यासाठी दोन प्रकारचे डबे देण्यात येणार आहे. त्यात संकलन करून कचरा गाडी आल्यावर त्यात कचरा देणे आहे. यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रत्येक मिळकतदारांना ओला व सुका कचऱ्यांचे डबे देण्यात येणार आहे. मिळकतकर थकीत असले तरी डबे देण्यात येणार आहे. कचरा संकलन करणे हा उद्देश असल्याचे आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. 


महानगरपालिका झोन क्रमांक ७ येथे नगरसेविका श्रीदेवी फुलारे, रियाज खरादी, मीनाक्षी कंपली, पूनम बनसोडे यांच्या हस्ते नागरिकांना डबे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका फुलारे म्हणाल्या, ओला व सुका कचरा डस्टबिनचा वापर करून महानगरपालिकेला सहकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...