आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातवा वेतन आयोग लागू न झाल्याच्या नैराश्यातून कर्मचाऱ्याची आत्महत्या, पशुवैद्यकीय केंद्रातील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्य सरकारने कालच अंदाजपत्रक सादर केले, त्यात सातव्या वेतन अायोगासाठी दहा हजार कोटींची तरतूद केली, पण प्रत्यक्षात सातवा वेतन अायोग लागू केल्याची घोषणा न केल्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी उमटले. सातवा वेतन अायोग लागू झाला नाही. यासाठी नेमलेल्या समितीचा अहवालही अाला नाही. बँक व सोसायटीचे कर्ज असल्यामुळे अात्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून पशू वैद्यकीय विभागातील परिचर पदावर काम करणाऱ्या नागनाथ दगडू शिंदे ( वय ५०, रा. सीना तेलगाव, उत्तर सोलापूर) यांनी केंद्रातील स्टोअररूममध्ये गळफास लावून अात्महत्या केली.

 

ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातला उघडकीस अाली. शिंदे हे देगाव येथील पशु वैद्यकीय विभागात परिचर म्हणून कामाला होते. शुक्रवारी सकाळपासूनच ते कामावर होते. डाॅ. परांडकर सोबत होते. त्यांना दुपारी उपचारासाठी काॅल अाल्यामुळे ते बाहेर तपासण्यासाी गेले होते. संध्याकाळी सातच्या सुमाराला कार्यालयात अाल्यानंतर अातून दरवाजा बंद होता. दरवाजा वाजवूनही अातून प्रतिसाद न अाल्यामुळे खिडकीतून पाहिल्यानंतर शिंदे यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसले. सलगरवस्ती पोलिसांना माहिती दिल्यानंतर गळफास सोडवून उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केले. यानंतर डाॅक्टरांनी मृत्यू पावल्याचे सांगितले. शिंदे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार अाहे. शनिवारी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अनुंकपा तत्त्वावर मुलाला नोकरी द्यावी. नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रशासनाकडे मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डाॅ. किरण पराग यांनी मध्यस्थी केल्यानंतर नातेवाईकानी मृतदेह ताब्यात घेतला. गावात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात अाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पराग यांनी शासनाकडे घटनेचा अहवाल पाठवू असे सांगितले.

 

तपास पुढे जात नाही
शासकीय विश्रामगृहात भानुदास शिंदे या शासकीय कर्मचाऱ्यानेच अात्महत्त्या केली होती. गेल्यावर्षी महापालिकेतील टेंडर प्रक्रियेची फाईल हाताळणाऱ्या कर्मचा-याने अात्महत्या केली होती. त्यानेही चिठ्ठीत काही अधिकाऱ्यांची नावे लिहिली होती. या घटनांचा तपास संथ गतीने अाहे.

 

शिंदे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली अाहे. सातवा वेतन अायोग लागू न झाल्याचा उल्लेख त्यात केला अाहे. नेमके कोणत्या बँकेचे कर्ज होते याची माहिती घेत अाहोत. नातेवाईकांकडूनही माहिती घेऊन तपासात नेमकी घटना समोर येईल.
- डी. के. वाघ, फौजदार, सलगरवस्ती

बातम्या आणखी आहेत...