आरटीई प्रवेशावर इंग्रजी शाळांचा बहिष्कार
सोलापूर- शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शुल्काचा परतावा मिळेपर्यंत, आरटीई प्रवेशावर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मेस्टाचे गणेश निळ यांनी पत्रकारांना दिली. मेस्टाची बैठक सोमवारी झाली. यामध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आधीच्या प्रवेशांच्या शुल्काचा परतावा मिळेपर्यंत शाळांची नोंदणी न करण्याचा निर्णय झाला आहे. आरटीई अंतर्गत २०१३ पासून आजपर्यंत झालेल्या पाच वर्षे होऊनही आतापर्यंत झालेल्या प्रवेशांचा परतावा शासनाकडून मिळाला नाही. हा परतावा मिळेपर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय मेस्टा संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. या वेळी हरिश शिंदे, एस. बी. रावडे, कृष्णदेव मदने, सज्जन रावडे उपस्थित हाेते.