आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉवरसाठी चार वर्षांपूर्वी शेतजमीन दिली, मोबदला मात्र अद्याप नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पॉवर ग्रीडचे टॉवर उभारण्यासाठी शेतजमीन घेण्यात आली, जमीन घेण्याबाबत २०१४ मध्ये एक नोटीस देण्यात आली, पण अद्याप मोबदला मिळालाच नाही, टॉवरच्या चार खांबापैकी तीन खांब शेजारील शेतकऱ्यांच्या तर एक खांब माझ्या शेतात आले, त्याचा मोबदला मिळाला, पण नियमानुसार दिला नाही. टॉवरच्या ताराखाली असलेल्या विहिरी, गोठा व घरांचाही मोबदला द्यावा, असे नमूद असताना शेतकऱ्यांना नाममात्र नुकसानभरपाई दिली आहे. यामुळे आमची फसवूणक करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासमोर केला. 


पॉवर ग्रीड, एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामकाजाविरोधात जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर आदी ठिकाणांहून ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गोरख घाडगे यांनी केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन टाॅवरसाठी ज्या जमिनी घेण्यात आल्या आहेत, त्याचा योग्य मोबदला मिळण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. टॉवरच्या तारामुळे ज्या ठिकाणी वीजप्रवार येत आहे, त्यांची पॉवर ग्रीडच्या तांत्रिकी अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल. त्याचा अहवाल १५ दिवसात घेऊन वीजप्रवाह येत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी भोसले यांनी दिले. यावेळी महादेव साखरे, संतोष घोडके, शब्बीर कुलकर्णी, सुनील बिराजदार, अप्पासाहेब लोंढे, नवनाथ माळी, बाळकृष्ण शिंदे, सुरेश पवार, राजेंद्र पाटील, विजयकुमार भरमगोंडे आदी उपस्थित होते. 


गोठ्यातील प्रत्येक वस्तूमध्ये वीजप्रवाह 
मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर-तांडोर येथील अरबाज शेख यांनी माझ्या गोठ्याच्या ७० फूट जवळून टॉवरची तार गेली आहे. गोठ्यातील प्रत्येक वस्तूला वीजप्रवाह उतरला आहे. याबाबत तक्रार दिली असता त्यांनी दुर्लक्ष केले. आंबे (ता. पंढरपूर) येथील नवनाथ माळी यांची तक्रार अधिक गंभीर आहे. टॉवरच्या चार खांबापैकी तीन खांबासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यास ७ लाख रुपये दिले आहेत, एक खांब माझ्या शेतात आले. पण त्यासाठी त्यांनी जुजबी नुकसानभरपाई दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...