आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा, प्राऊड अाॅफ यू...पाटकूलचे सहायक फौजदार सवणे यांना राष्ट्रपती पदक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बाबांनी अामच्यासाठी अपार कष्ट घेतले. चांगले संस्कार, शिक्षण दिले. कुटुंबवत्सल अामचा परिवार. अाज बाबांना सर्वोच्च राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. ही गोड बातमी त्यांनीच घरी फोेन करून सांगितली. अाई बोलली. मीही बोललो. बाबा.. प्राऊड अाॅफ यू, अभिमान वाटतो तुमचा, अशा शब्दांत अभिनंदन करताना माझा ऊर भरून अाल्याचे सांगत होता अनिकेत सवणे. मलाही खूप अानंद झालाय त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशा भावना अाहेत सौ. सुरेखा यांच्या. ग्रामीण पोलिस दलात विशेष शाखेत काम करणारे सहायक फौजदार दिलीपकुमार ब्रबुवान सवणे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्यानंतर 'दिव्य मराठी'शी त्यांचा मुलगा अनिकेत, पत्नी सुरेखा यांनी संवाद साधला.

 

दिलीपकुमार सवणे हे मूळचे पाटकूल (मोहोळ) येथील. सध्या केशवनगर पोलिस वसाहतीत राहतात. वडील बब्रुवान निवृत्त शिक्षक. अाई गृहिणी. १९८३ साली ते दलात अाले. जेल रोड, अकलूज, सोलापूर तालुका, एलसीबी येथे काम केले. बुधवारी दुपारी करमाळा पोलिस ठाण्यात असताना ही अानंदाची बातमी समजली. गुरुवारी सोलापुरात येणार असून परिवरासोबत अानंद साजरा करणार अाहे. २०१५ मध्ये पोलिस महासंचालक सन्मान पदक मिळाले होते. ३६८ रिवाॅर्ड मिळाली अाहेत. मला खूप मोठा हा सन्मान मिळाला. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, माझे सहकारी यांची साथ मिळाली. परिवाराचा पाठिंबा मिळाला. अातापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल केली. चांगल्या व प्रामाणिक कामाचे फळ मिळाले, अशी भावना सवणे यांनी व्यक्त केली. सवणे यांचा मुलगा अनिकेत हा बीई पदवीधर असून तो पुण्यात अायटी इंजिनीअर अाहे. मुुलगी अनघा या शिक्षिका असून नांदेड हे त्यांचे सासर. पत्नी सुरेखा या गृहिणी अाहेत.


तीन पोलिसांना पदक
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा झाली. महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये तीन पोलिसांना 'राष्ट्रपती पोलिस पदक, सात जणांना पोलिस शौर्यपदक तर ३९ जणांना 'पोलिस पदक' जाहीर झाले.

बातम्या आणखी आहेत...