आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखर उतरली; कारखाने चुकारे देण्यास असमर्थ, निम्मे कारखाने बंद पडण्याची भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड - गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या भावात तब्बल ५५० रुपयांची घसरण झाली आहे. हे भाव सरासरी प्रतिक्विंटल २,५५० रुपयांवर आले आहेत. साखर तारण ठेवून बँका ७० टक्के कर्ज देतात. एक क्विंटल साखर तारण ठेवून बँक कारखान्याला केवळ १७८५ रुपये प्रमाणे कर्ज देत आहेत. अशा अडचणीत सापडलेल्या राज्यातील बहुतांश कारखान्यांनी १५ फेब्रुवारीनंतर शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत.

 

दुसरीकडे २३ एप्रिलच्या अगोदर एफआरपीप्रमाणे उसाचे पैसे दिले नाहीत तर कठोर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पन्नास टक्क्यांच्या वर साखर कारखाने पुढील वर्षी अडचणीत येण्याची भीती आहे.
२०१४-१५ व २०१५-१६ या दाेन वर्षात दुष्काळाच्या झळा बसल्याने सन २०१६-१७- मध्ये राज्यातील ८८ सहकारी व ६२ खासगी अशा एकूण १५० साखर कारखान्यांनी उसाचे गाळप करण्यास सहभाग नोंदवला होता.

 

मागच्या वर्षी या कारखान्यांनी १९ एप्रिल २०१७ पर्यंत ३७३.१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून ४२०.०१ लाख क्विंटल साखर उत्पादन केले होते. मागच्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली हाेती. त्यामुळे या वर्षी म्हणजे सन २०१७-१८ राज्यात उसाचे चांगले उत्पादन आलेले आहे. परिणामी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १०१ सहकारी व ८६ खासगी अशा एकूण १८७ साखर कारखाने ऊस गाळपासाठी उतरले.

 

या कारखान्यांनी परवापर्यंत (दि.१९) ९४२.१३ लाख मेट्रिक टनाचे गाळप करून १०५६.७६ लाख क्विंटल साखर उत्पादन केलेले आहे. साखर उत्पादनाचा हा आकडा मागच्या वर्षीपेक्षा ६३६.७५ लाख क्विंटल म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत तीन पट जास्त झाले आहे.

 

...तर बँकही आपले पैसे वळते करते
आज साखरेचे भावही सरासरी २,५५० आहेत. वाहतूक व ऊसतोडीचे पैसे कारखान्यांना अगोदरच सरासरी ७०० रुपये (प्रति टन) अदा करावे लागतात. साखर विकली की बँकही आपले पैसे वळते करून घेते. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे पैसे कधी व कसे देणार या विवंचनेत १५ फेब्रुवारीपासून पैसे अडकून पडले अाहेत. भावात अस्थिरतेने १-२ दिवस गरजेपुरतीच साखर विकली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...