आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी समांतर जलवाहिनीस स्मार्ट सिटीतून ५० कोटी निधी; महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील पाणीप्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी उजनी ते सोलापूर दरम्यान दुहेरी जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव आहे. ४३९ कोटींच्या योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यात केंद्र, राज्य व एनटीपीसीसह महापालिकेचा ७५ काेटी रुपयांचा हिस्सा आहे. हा हिस्सा स्मार्ट सिटीतून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी महापौर निवासस्थानी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उजनी समांतर जलवाहिनीसाठी स्मार्ट सिटीतून ५० कोटी देण्यावर चर्चा झाली. 


शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी होणे आवश्यक अाहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यानुसार त्यांनी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १०५ किमी लांबीची ११० एमएलच्या ४३९ कोटींच्या योजनेस मंजुरी दिली. यात महापालिका ७५ कोटी, राज्य शासन ७५ कोटी, केंद्र सरकार १५० कोटी तसेच एनटीपीसी १३९ कोटी देणार आहे. 


महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता, ७५ कोटी रुपये भरणे शक्य नाही. महापालिकेच्या हिश्याची रक्कम स्मार्ट सिटी योजनेतून देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. त्याबाबत शासनाकडून मंजुरी घेऊन, सभागृ़हाच्या मान्यता घेऊन अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे. दरम्यान महापालिका सभागृहात पुरवणी किंवा तातडीचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने सुरू केला. याबाबत मंगळवारी महापौर निवास येथे महापालिका पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे उपस्थित होते. दुहेरी जलवाहिनीबाबत महापालिका सभागृहात प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यास तातडीने मंजुरी द्या, अन्यथा दिरंगाई होईल, असे मत महापालिका आयुक्तांनी व्यक्त केले. प्रस्ताव सादर करा. त्यास मंजुरी देण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी म्हणणे मांडल्याचे समजते. 


स्मार्ट सिटीतून सुपर मार्केट बांधणार 
नवीवेस पोलिस चौकीच्या मागील बाजूस असलेले सुपर मार्केट स्मार्ट सिटी योजनेतून बांधण्याबाबत चर्चा झाली. यामुळे या परिसरातील व्यापार वाढेल. स्मार्ट सिटी एरियात मार्केट असल्याने यातून विकास करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. 


दुहेरी जलवाहिनी योजनेवर चर्चा 
दुहेरी जलवाहिनीच्या बाबतीत महापौर निवास येथे चर्चा झाली. आयुक्त सभागृहाात प्रस्ताव सादर करणार आहेत. त्यास मंजुरी देण्याबाबत चर्चा झाली. नवीवेस जवळील सुपर मार्केट स्मार्ट सिटीतून बांधण्याबाबत चर्चा झाली. गाळ्याच्या बाबतीत चर्चा झाली. त्यात माझे मत मी व्यक्त केले.

- महेश कोठे, मनपा विरोधीपक्ष 

बातम्या आणखी आहेत...