आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमणी जैसे थे, पर्यायाचाही विचार होईना, 'बोरामणी'ची फाइल पडूनच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- होटगीर स्त्यावरील विमानतळाच्या उड्डानाला अडथळा असलेल्या चिमणीचा विषय प्रशासन मार्गी लावत नाही, दुसरा पर्यायही शोधत नाही. त्यामुळे उडानमधून सोलापूरला वगळण्यात अाले. अन्य शहरातील उडान योजना २३ डिसेंबरपासून सुरू होत अाहे. सोलापूर मात्र अाता प्रतिक्षेत राहीले अाहे, तर दुसरीकडे बोरामणी विमानतळासंदर्भातील निर्वनीकरणबाबतचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने दिलेला प्रस्ताव गेली सहा महिने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडून आहे. त्यामुळे विमानसेवेबाबत प्रशासन पातळीवरच उदासीनता दिसते अाहे. 


माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशंदे यांनी पत्र देऊन बोरामणी िवमानतळाचा विकास करण्याची माणगी केली. त्यानुषंगाने प्रशासनाकडून माहिती घेतली असता जिल्हाधिकारी कार्यालयातकडूनच निर्णय होत नसल्याचे समोर अाले. नियोजित बोरामणी विमानतळासाठी संपादित केलेल्या जमिनीपैकी ३३ हेक्टर जमीन वनविभागाची आहे, यासाठी त्या जमिनीचे निर्वनीकरण आवश्यक आहे. नागपूर येथील वनविभाग कार्यालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित जमिनीवर अतिक्रमण आहे का? ही जमीन आरक्षित आहे का ? अशी विचारणा केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांचा अभिप्राय असलेले पत्र आवश्यक आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून जिल्हाधिकारी कार्यालयास हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा महिन्यापूर्वी प्रस्ताव दिला आहे, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. सन २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कालावधीत राज्य शासनाने बोरामणी विमातळास मंजुरी दिल्यानंतर भूसंपादन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भूसंपादन प्रक्रियेनंतर ४५० हेक्टर जागा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. यासाठी राज्य शासनाने ना निधी दिला ना कोणती विकास कामे सुरू केली. 


अभिप्रायअसलेले पत्र आवश्यक आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून जिल्हाधिकारी कार्यालयास हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा महिन्यापूर्वी प्रस्ताव दिला आहे, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. सन २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कालावधीत राज्य शासनाने बोरामणी विमातळास मंजुरी दिल्यानंतर भूसंपादन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भूसंपादन प्रक्रियेनंतर ४५० हेक्टर जागा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. यासाठी राज्य शासनाने ना निधी दिला ना कोणती विकास कामे सुरू केली. 


सोलापूरहून जेव्हा विमान सेवा सुरू होईल तेव्हा सोलापूरकरांना त्याचं महत्त्व समजेल. पुण्यात आयटी क्षेत्र वाढलं आहे. सोलापुरातून विमानसेवा सुरु झाली तर सोलापुरात देखील आयटी कंपन्या येतील. येथील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागनार नाही. सोलापुरातच रोजगराच्या संधी निर्माण होतील. विमानांनी प्रवास करणे हे आता उच्च जीवनशैलीचे प्रतीक राहिलेले नाही तर ती आता मूलभूत गरज बनली आहे.
- राम रेड्डी, उद्योजक 


शहराचा विकास करायचा असेल तर सोलापुरातून विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. राज्यातील अन्य शहरातून विमानसेवा सुरु होत असेल आणि सोलापुरातुन मात्र होत नसेल तर याचा वेगळा संदेश जाईल. ही अशीच परिस्तिथी राहिली तर सोलापूरचे पुन्हा गिरणगाव होण्यास वेळ लागणार नाही.

- यतीन शहा, उद्योजक 


सोलापूरहूनविमानसेवासुरु करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे विमानसेवा सुरु करायची कि नाही हे आत्ताच सांगता येणार नाही.
- एस.सुंदरम, व्यवस्थापक, एअर डेक्कन, बंगळूरू 


सोलापूर चाविकास करायचा असेल तर विमानसेवा सुरू झालीच पाहिजे. विमानसेवेला चिमणीचा अडथळा होत आहे. तर ती पाडली का जात नाही. सोलापुरात केवळ उड्डाणपूल करून शहराचा विकास होणार नाही. सोलापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी विमान सेवेप्रकरणी लक्ष दिलं पाहिजे.
- केतन शहा, व्यापारी 


निर्वनीकरणाच्या फाइलचा प्रवास... 
सोलापूरवनविभागाने निर्वनीकरणाचा प्रस्ताव पुणे कार्यालयास सादर केला, पुणे कार्यालयाने या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास दिले, त्रुटी दूर केल्यानंतर हा प्रस्ताव नागपूर कार्यालयास सादर करण्यात आला. यावर पुन्हा नागपूर कार्यालयाने त्रुटी काढून पूर्तता करण्याचे पत्र विमानतळ विकास कंपनीला केले. त्यानुसार विमानतळ विकास कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयास प्रमाणपत्राची मागणी केली. अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे पत्र मिळाले नाही. 


उडानच्या घोषणेत सोलापूर नाही 
उडान योजनेत सोलापूरचा समावेश झाल्यानंतर सोलापूरकरांना अानंद झाला होता. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होईल ही अाशा होती. तीही हिरावली गेली. उडान योजनेतील िवमान सेवेची घोषणा झाली, एअर डेक्कन कंपनीने केलेल्या घोषणेत २३ डिसेंबरपासून मुंबई नाशिक, पुणे नाशिक मुंबई जळगाव या सेवेचा समावेश अाहे. सोलापूर कोल्हापूर मुंबई ही सेवा लवकरच म्हणून बाजूला ठेवली गेली. त्यामुळे सोलापुरातून नाराजी पसरली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...