आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होटगी रस्त्यावरील चव्हाण मोटर्सला शॉर्टसर्किटने आग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- होटगी रस्त्यावरील मारुती सुझुकीच्या चव्हाण मोटर्सला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुमारे दोन तास ही आग धुमसत होती. ताबडतोब अग्निशामक दलाच्या वाहनांना दूरध्वनी करण्यात आल्याने काही मिनिटातच पाण्याचे बंब दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. 


तब्बल १८ पाण्याचे बंब वापरून २० कर्मचारी दोन तास आग विझवण्यासाठी झटत होते. सुमारे ९० हजार लिटर पाण्याने ही आग विझवल्याचे अग्निशामक दल प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले. या शोरूमचे दोन दिवसानंतर नूतनीकरणाचे उद््घाटन होते. त्याकामी त्याच्या वायरिंगचे काम सुरू असून शॉर्टसर्किटने आग लागल्याचे केदार आवटे यांनी सांगितले. 


नेमके किती नुकसान झाले? याची चौकशी केली असता, व्यवस्थापक बिद्री यांनी नेमके सांगता येणार नाही, माहिती तपासून नेमका आकडा सांगता येईल, असे सांगितले. आग लागल्यानंतर परिसरात सर्वत्र धुराचे लोट व रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सोशल मीडियावर अवघ्या काही मिनिटात या भयंकर आगीचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले. 

बातम्या आणखी आहेत...