आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनरव्हीलचा पाच हजार गरिबांना जेवण देण्याचा संकल्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून इनरव्हील क्लब चालविला जातो. महिला पदाधिकाऱ्यांकडून चालविणाऱ्या या क्लबचा शुक्रवारी पदग्रहण सोहळा होता. तेव्हा नूतन पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या सोहळ्यानिमित्त समाजातील गाेरगरीब आणि भुकेलेल्यांना अन्न देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच लोकांना अन्नदान करत आपल्या कार्याची सुरुवात करण्यात आली. आता दररोज पाचप्रमाणे वर्षभराच्या कार्यकाळात पाच हजार लोकांना जेवण देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 


पदभार स्वीकारण्याबरोबच अन्नदानाचा अागळावेगळा उपक्रम सुरू केल्याबद्दल महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून काम करणाऱ्या इनरव्हील क्लबच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी आपल्या कार्याची दखल घेण्यास भाग पाडले. यापुढे दरराेज पाच भुकेलेल्यांना अन्न देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ संगमनेरच्या प्रसिद्ध उद्योगपती रचना मालपाणी व नूतन अध्यक्षा अर्चना जाजू यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या दिवशीची जबाबदारी रॉबिन हूड आर्मीच्या सदस्यांनी स्वीकारली होती. वर्षभर दररोज चार चपाती, भाजी, चटणी व लोणचे पाच लोकांना देण्यात येईल. त्यासाठी वार्षिक ५४,००० रुपये खर्च येणार आहे. 


यावेळी नूतन अध्यक्षा अर्चना जाजू या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या, दररोज हजारो लोक अन्नावाचून उपाशी झोपतात. सामाजिक भान राखत गरजू लोकांपर्यत अन्न पोहोचविण्याचा विचार आला. पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी दररोज पाच लोकांना जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षभराच्या कार्यकाळात पाच हजार लोकांना जेवण देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार कामाची सुरुवातही केली आहे. 


यांनीही लावला हातभार 
इनरव्हील क्लबच्या अन्नदान उपक्रमात इतरांनाही सहभाग घेतला. सूरज रघोजी यांनी आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तसेच दर्शना डोईजोडे यांनी वाढदिवसानिमित्त १०० लोकांना जेवण दिले. या कार्यक्रमाचे संयोजन रॉबिन हूड आर्मीचे प्रा. हिंदूराव गोरे यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...